‘नोटाबंदी म्हणजे मोदींची हुकूमशाही’
By admin | Published: November 15, 2016 06:29 AM2016-11-15T06:29:50+5:302016-11-15T06:29:50+5:30
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय म्हणजे मोदी सरकारचा मनमानी कारभार आहे. विनानियोजन नोटाबंदीचा
मुंबई : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय म्हणजे मोदी सरकारचा मनमानी कारभार आहे. विनानियोजन नोटाबंदीचा निर्णय जाहीर करणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची हुकुमशाही आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांनी सोमवारी केली. देशातील गोंधळाची स्थिती लक्षात घेत नोटाबंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
नोटाबंदीमुळे देशभरातील दैनंदीन व्यवहार ठप्प झाले आहेत. लोक नोकरी, व्यवसायाची कामे सोडून सध्या नोटा बदलण्यासाठी बँकांसमोरच्या रांगेत उभे आहेत. एक प्रकारची आर्थिक आणिबाणीच सारा देश अनुभवतो आहे. नियोजनाशिवाय घेण्यात आलेला हा निर्णय आहे, अशी टीका अबु आझमी यांनी केली. (प्रतिनिधी)