53 व्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी नामांकने जाहीर

By admin | Published: April 14, 2016 07:08 PM2016-04-14T19:08:08+5:302016-04-14T19:18:57+5:30

५३ व्या महाराष्ट्राच्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी यावर्षी एकूण ७३ चित्रपट सहभागी झाले होते. त्यातून उत्कृष्ट चित्रपटासाठी अंतिम फेरीकरिता खालील १० चित्रपटांची नामांकने जाहीर करण्यात येत आहेत.

Nominations released for the 53rd Marathi Film Festival | 53 व्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी नामांकने जाहीर

53 व्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी नामांकने जाहीर

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - राज्य शासनाच्यावतीने मराठीतील उत्कृष्ट चित्रपटांना दरवर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंती नमित्त दि.30 एप्रिल रोजी प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठीची नामांकने सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडे यांनी आज येथे घोषित केली.  उत्कृष्ट चित्रपटांसाठी 10 चित्रपटांची तर वैयक्तिक पुरस्कारांसाठी 3 नामांकने आणि तांत्रिक पुरस्कार घोषित करण्यात येतात.  30 एप्रिल रोजीच्या  समारंभाप्रसंगी नामांकनांमधून  अंतिमत: निवडलेले पुरस्कार जाहीर केले जातात.  यावेळी पुरस्कार प्रदान सोहळा मुंबईत बोरिवली येथे जन.अरुण कुमार वैद्य मैदानावर होणार आहे.  मुंबई उपनगरात प्रथमच हा सोहळा होत आहे. 
 
५३ व्या महाराष्ट्राच्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी यावर्षी एकूण ७३ चित्रपट सहभागी झाले होते. त्यातून उत्कृष्ट चित्रपटासाठी अंतिम फेरीकरिता खालील  १० चित्रपटांची नामांकने जाहीर करण्यात येत आहेत. ती पुढीलप्रमाणे - कट्यार काळजात घुसली, दि सायलेंस, दगडी चाळ, बायस्कोप, डबलसीट, नटसम्राट, हलाल, रिंगण, रंगा पतंगा आणि हायवे.
 
त्याशिवाय खालीलप्रमाणे तांत्रिक पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत-
 
 उत्कृष्ट कला दिग्दर्शन - विभागून संतोष फुटाणे (कट्यार काळजात घुसली) व महेश साळगावकर (मितवा), उत्कृष्ट छायालेखन कै.पांडूरंग नाईक पारितोषिक - अभिजित डि.अब्दे (रिंगण), उत्कृष्ट संकलन - क्षितिजा खंडागळे (दगडी चाळ), उत्कृष्ट ध्वनीमुद्रण - प्रमोद थॉमस (डबलसीट), उत्कृष्ट ध्वनीसंयोजन - अनमोल भावे (कट्यार काळजात घुसली), उत्कृष्ट वेशभूषा- नचिकेत बर्वे, पूर्णिमा ओक (कट्यार काळजात घुसली), उत्कृष्ट रंगभूषा - विक्रम गायकवाड (कट्यार काळजात घुसली), उत्कृष्ट बालकलाकार - विभागून साहिल जोशी (रिंगण) व वेदश्री महाजन (द सायलेंस)
 
 या शिवाय वैयक्तिक पुरस्कारासाठी तीन नामांकने खालीलप्रमाणे आहेत त्यातून एका व्यक्तीची अंतिम फेरीअंती निवड होईल.
 
प्रथम पदार्पण चित्रपट निर्मितीकरिता नामांकने - एस.एम.आर.फिल्म़्‌स नवनीत हुतलड (द सायलेंस), अे.के.एफ.फिल्म्स लक्ष्मण एकनाथ कागणे (हलाल), मुव्ही एल.एल.पी. सचिन आडसुळ, नितीन आडसुळ, डेरेल कॉक्स, क्लार्क मार्क मॅकमिलियन आणि रुपेश महाजन (परतु)
 प्रथम पदार्पण दिग्दर्शनाकरिता नामांकने - सुबोध भावे (कट्यार काळजात घुसली), मकरंद माने (रिंगण) आणि प्रसाद नामजोशी (रंगा पतंगा)
 
अंतिम फेरीनंतर या चित्रपटांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतिय पुरस्कारासाठी तसेच सामाजिक प्रश्न हाताळणारा उत्कृष्ट चित्रपट तसेच ग्रामीण प्रश्न हाताळणारा उत्कृष्ट चित्रपट निवडण्यात येईल.
 
सर्वोकृष्ट कथा - राजन खान (हलाल), मकरंद माने (रिंगण), क्षितिज पटवर्धन (डबलसीट),
उत्कृष्ट पटकथा - मकरंद माने (रिंगण), क्षितिज पटवर्धन, समीर विध्वंस (डबलसीट), पांडुरंग कुलकर्णी (हायवे), उत्कृष्ट संवाद - किरण यज्ञोपवित (नटसम्राट), मकरंद माने (रिंगण), क्षितिज पटवर्धन (डबलसीट), उत्कृष्ट गीते - मंगेश कांगणे - समीर सामंत (कट्यार काळजात घुसली), अवधूत गुप्ते (एक तारा), सईद अख्तर, सुबोध पवार (हलाल), उत्कृष्ट संगीत - शंकर-एहसान- लॉय (कट्यार काळजात घुसली), शशांक पोवार (परतु), अवधुत गुप्ते (एक तारा).
 
उत्कृष्ट पार्श्वसंगीत - ऋषिकेश-सौरभ-जसराज (डबलसीट), अमर मोहिले (एक तारा), हनी सातमकर (हलाल),
उत्कृष्ट पार्श्वगायक - शंकर महादेवन (कट्यार काळजात घुसली), अवधूत गुप्ते (एक तारा), आदर्श शिंदे (रंगापतंगा),
उत्कृष्ट पार्श्वगायिका - जान्हवी प्रभू अरोरा (मितवा), आनंदी जोशी (दगडी चाळ), श्रेया घोषाल (निळकंठ मास्तर), उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक - उमेश जाधव (उर्फी), सुजीत कुमार (संदूक), राजू खान (कॅरी ऑन मराठा),
 
उत्कृष्ट अभिनेता - सचिन पिळगावकर (कट्यार काळजात घुसली), अंकुश चौधरी (डबलसीट), शशांक शेंडे (रिंगण), उत्कृष्ट अभिनेत्री - मुक्ता बर्वे (डबलसीट), स्मिता तांबे (परतु), मृण्मयी देशपांडे (अनुराग), उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री  - (शिफारस नाही) उत्कृष्ट विनोदी अभिनेता - प्रियदर्शन जाधव (टाईमपास 2), सुमीत राघवन (संदूक), भारत गणेशपुरे (वाघेऱ्या), सहाय्यक अभिनेता - सुबोध भावे (कट्यार काळजात घुसली), विक्रम गोखले (नटसम्राट), संदिप पाठक (रंगा पतंगा), सहाय्यक अभिनेत्री - अमृता खानविलकर (कट्यार काळजात घुसली), अंजली पाटील (द सायलेंस), प्रार्थना बेहरे (मितवा), उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता - गश्मीर महाजनी (कॅरी ऑन मराठा), शंकर महादेवन (कट्यार काळजात घुसली), संदीप खरे (बायस्कोप(मित्रा)), उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री - मुग्धा छापेकर (द सायलेंस), उर्मिला निंबाळकर (एक तारा), मिताली मयेकर (उर्फी)
 
       
प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून रमेश साळगांवकर, रत्नाकर पिळणकर, अनिल सुतार, प्रशांत पाताडे, नरेंद्र विचारे, संजय धारणकर, शशिकांत म्हात्रे, नंदू वर्दम, मुकुंद मराठे, मधुरा वेलणकर, दत्ता तावडे, विवेक दामले, संजीव नाईक, गणेश मतकरी यांनी काम पाहिले.

Web Title: Nominations released for the 53rd Marathi Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.