राज्यातील ग्रामसेवकांचे ७ नोव्हेंबर पासून असहकार

By admin | Published: October 17, 2016 07:50 PM2016-10-17T19:50:09+5:302016-10-17T19:50:09+5:30

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरीत मान्य कराव्या, यासाठी राज्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ७ नोव्हेंबर पासून प्रशासनासोबत असहकार आंदोलन पुकारणार आहेत.

Non-cooperation from the Gram Sevaks on 7th November | राज्यातील ग्रामसेवकांचे ७ नोव्हेंबर पासून असहकार

राज्यातील ग्रामसेवकांचे ७ नोव्हेंबर पासून असहकार

Next

ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. १७: ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरीत मान्य कराव्या, यासाठी राज्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ७ नोव्हेंबर पासून प्रशासनासोबत असहकार आंदोलन पुकारणार आहेत. दरम्यान असहकार आंदोलनाच्या कालावधीत वरिष्ठ कार्यालयांच्या सभांवर बहिष्कार टाकण्यासोबतच कोणत्याही अधिकाऱ्याला दफ्तर तपासणी करु न देण्याचा निर्णय ग्रामसेवक संघटनेने घेतला आहे.

ग्रामसेवकांचा सेवाकाळ तीन वर्षाचा गृहीत धरणे, तीन हजार लोकसंख्येला ग्रामविकास अधिकारी सांझा निर्मीती करणे, विस्तार अधिकारी पदांची वाढ करणे व ती पदे पदोन्नतीने भरणे, डीसीपीएस यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, २६ जानेवारी आणि १५ आॅगस्टला ग्रामसभा न घेणे यासह विविध १७ मागण्यांसाठी राज्यात हे आंदोलन पुकारल्या जाणार आहे.

राज्यातील सर्व पंचायत समितीसमोर ७ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन पुकारण्यात येणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन व १५ नोव्हेंबर सर्व विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे दिल्या जाणार आहेत. १७ नोव्हेंबर पासून सर्व ग्रामपंचायतीच्या चाव्या आणि शिक्के गटविकास अधिकाऱ्यांकडे देण्याचा निर्णय ग्रामसेवक संघटनेने घेतला आहे.

Web Title: Non-cooperation from the Gram Sevaks on 7th November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.