इंद्राणीचा पोलीस तपासात असहकार

By admin | Published: August 29, 2015 01:46 AM2015-08-29T01:46:07+5:302015-08-29T01:46:07+5:30

गेल्या तीन दिवसांपासून पोलीस आयुक्त राकेश मारियांपासून तपास अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीकडे कसून चौकशी केली. मात्र या संपूर्ण चौकशीसत्रात तीने तपासाला

Non-cooperation in Indrani police investigation | इंद्राणीचा पोलीस तपासात असहकार

इंद्राणीचा पोलीस तपासात असहकार

Next

- अमर मोहिते/पूजा दामले,  मुंबई
गेल्या तीन दिवसांपासून पोलीस आयुक्त राकेश मारियांपासून तपास अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीकडे कसून चौकशी केली. मात्र या संपूर्ण चौकशीसत्रात तीने तपासाला असहकार्य केले. शीनाची हत्या मी केलेली नाही, असे तिने ठामपणे पोलिसांना सांगितल्याचे समजते.
दुसरीकडे ड्रायव्हर श्याम राय याने मात्र संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला आहे. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत. आम्ही श्याम राय याने दिलेल्या माहितीची शहानिशा करत आहोत. काही अंशी रायने दिलेली माहिती खरी आहे. संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट करण्याचा, पुरावे शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले.
अटक झाली तेव्हा श्याम इंद्राणीकडे कामाला नव्हता. काही महिन्यांपुर्वी त्याला कामावरून कमी करण्यात आले होते. सुरूवातीला त्याला अवैधपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली. चौकशीत या हत्याकांडाची माहिती पुढे आली. मात्र त्याच्याकडून हस्तगत केलेल्या शस्त्राचे या हत्याकांडाशी किंवा आरोपींशी काही संबंध आहे का, असे विचारता या अधिकाऱ्याने नाही असे सांगितले.
या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ दास हे शीनाचे वडील आहेत. ते जिवंत आहेत. मात्र त्यांच्या ठावठिकाण्याबाबत माहिती देण्यासही या अधिकाऱ्याने नकार दिला.

Web Title: Non-cooperation in Indrani police investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.