विना अनुदानीत शिक्षकांचा मोर्चा, शहीद शिक्षकांचे कुटुंबीय करणार मोर्चाचे नेतृत्व

By Admin | Published: October 3, 2016 06:52 PM2016-10-03T18:52:08+5:302016-10-03T18:53:00+5:30

शिक्षणमंत्र्यांच्या सुलतानशाही कारभाराचा निषेध करण्यासाठी तथा सर्व विनाअनुदानीत शाळां तुकड्यांना प्रचलित टप्प्यानुसार अनुदान द्या, या मागणीसाठी

Non-funded teachers 'rallies, the leadership of the martyrs' family, the leadership of the morcha | विना अनुदानीत शिक्षकांचा मोर्चा, शहीद शिक्षकांचे कुटुंबीय करणार मोर्चाचे नेतृत्व

विना अनुदानीत शिक्षकांचा मोर्चा, शहीद शिक्षकांचे कुटुंबीय करणार मोर्चाचे नेतृत्व

googlenewsNext

ir="ltr">श्यामकुमार पुरे/ऑनलाइन लोकमत

सिल्लोड, दि. 3- शिक्षणमंत्र्यांच्या सुलतानशाही कारभाराचा निषेध करण्यासाठी तथा सर्व विनाअनुदानीत  शाळा तुकड्यांना प्रचलित टप्प्यानुसार अनुदान द्या, या मागणीसाठी ४ ऑक्टोंबर रोजी औरंगाबाद येथे होणा-या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विना अनुदानित कृती समितिने "अनुदान हक्क मोर्चा "आयोजित केला आहे. मोर्चाचे नेतृत्व शहीद शिक्षकांचे कुटुंबीय करणार आहे.
विनाअनुदानीत शिक्षकांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या शासनास वठनीवर आणण्यासाठी मोर्चात सहभागी व्हा असे आव्हान सिल्लोड कृति समिति ने केले आहे.


गेल्या सोळा वर्षापासून विनावेतन शाळेवर शिक्षणाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांना भाजपा सरकारणे झुलवत ठेवले आहे.भाजपा सरकारच्या या कृत्यामुळे विनाअनुदानित शिक्षक आत्महत्या करीत आहे.

कृति समितीच्या वतीने विनाअनुदानीत शाळांना अनुदान मिळाले पाहिजे याकरिता एकशे तीस पेक्षा जास्त आंदोलन केले परंतु जुल्मी शासनाला तसेच शिक्षणमंत्र्यांना काही पाझर फुटला नाही.शिक्षणमंत्री विनोद तावड़े यांनी आतापर्यंत फ़क्त आश्वासनाची खैरात केली कोणत्याही ठोस उपाययोजना न करता फक्त विनाअनुदानीत शिक्षकांचा अंत बघन्याचा छंद शिक्षणमंत्र्यांनी चालवलाय.

महाराष्ट्रात सोळा वर्षापासून विनावेतन काम करणाऱ्या पंधरा पेक्षा जास्त विनाअनुदानित शिक्षकांचा आज ना उद्या पगार मिळेल या आक्षेपोटि बळी गेले पण काही पगार सुरु झाला नाही.परंतु आता विना वेतनाच्या वेदना सहन होत नसल्याने विना अनुदानीत शिक्षक आत्महत्या करीत आहे.


परंतु शिक्षणमंत्र्यांनी विनाअनुदानीत शिक्षकांच्या भावना समजून न घेता सरसकट २०% अनुदानाची घोषणा केली त्यातही अवाढव्य् जाचक अटी लादल्या.

मोर्चाचे नेतृत्व शहीद शिक्षकांचे कुटुंबीय करणार असून या प्रसंगी महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब म्हसकर, उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, कार्यवाह अरूण मराठे,सचिव पुंडलिक रहाटे,कार्याध्यक्ष आर झेड बाविस्कर, सहसचिव गोरख कुलधर,मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रशांत रेडिज,शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर ,यादव शेळके,सुधाकर वाहुरवाघ,नाना पाटील,बबनराव पेटकर ,ज्ञानेश्वर दळवी, सुरेश कामनापुरे ,नंदकिशोर धानोरकर चंद्रपूर,ज्ञानेश्वर यादव,गोपाल गुरूभाई,यांची उपस्तिथी राहणार आहे.तालुक्यातील विनाअनुदानित शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्तिथ राहन्याचे आवाहन सिल्लोड तालुका विनाअनुदानित कृति समितीचे अध्यक्ष संजय बड़क,उपाध्यक्ष सोहेल कादरी,सचिव मंजीत श्रीवास्तव उपास्थित राहणार  आहे.

Web Title: Non-funded teachers 'rallies, the leadership of the martyrs' family, the leadership of the morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.