... तर सेनेची पळता भुई थाेडी हाेईल!; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 05:51 AM2022-07-31T05:51:04+5:302022-07-31T05:53:03+5:30

ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते.

'non marathi Developers in the office of Jitendra Awhad?'; BJP does not agree with Governor's statement | ... तर सेनेची पळता भुई थाेडी हाेईल!; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना इशारा

... तर सेनेची पळता भुई थाेडी हाेईल!; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना इशारा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोणाला सलाम करत होते, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी शनिवारी केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे गृहनिर्माणमंत्री असताना किती मराठी विकासक त्यांच्या कार्यालयात येत होते? अमराठी विकासकांची रांग का होती? उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत किती मराठी कंत्राटदारांना काम दिले, असा सवालही त्यांनी केला.

ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाच्या कष्टाने घामाने, हौतात्म्याने, मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली आहे. त्यामुळे कोणीही कुठल्याही पदावर बसून मराठी माणूस, संस्कृती, भाषा याचा विपर्यास होईल, अशी स्थिती आणू नये, असे आमचे स्पष्ट मत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
आव्हाड आणि मराठी माणसाच्या हिताचा संबंध काय? गृहनिर्माणमंत्री असताना त्यांच्या दालनात अमराठी विकासकांची रांग का होती?, माफीचा उद्योग करायचा असेल तर बऱ्याच माफी मागाव्या लागतील, तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असताना कोणत्या विकासकाला थंड हवेचे ठिकाण विकसित करायला दिले होते?, मुंबई महापालिकेत २५ वर्षांत एकाही मराठी कंत्राटदाराला येऊ दिले नाही, याचे उत्तर सेनेने द्यावे.

... तर सेनेची पळता भुई थाेडी हाेईल!
कोल्हापुरी चप्पल आणि जोडे मारो आंदोलनाची एवढीच खुमखुमी असेल, तर सावरकरांचा अपमान केल्यावर मणीशंकर यांना जोडे मारण्याचा कार्यक्रम बाळासाहेबांनी केला. काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीत आल्यावर काँग्रेसने जी अभद्र भाषा वापरली, त्यानंतर तुमच्या हातात ते जोडे का नाही आले, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला. जोडे मारायचेच असतील आणि माफीची मागणीच करायची असेल तर बरेच विषय समोर येतील आणि शिवसेनेची पळता भुई थोडी होईल, असा टोलाही शेलार यांनी लगावला.

Web Title: 'non marathi Developers in the office of Jitendra Awhad?'; BJP does not agree with Governor's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.