नॉन स्टॉप अनिल सोले
By admin | Published: June 25, 2014 01:28 AM2014-06-25T01:28:27+5:302014-06-25T01:28:27+5:30
विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघात भाजपचे उमेदवार अनिल सोले यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली मतांची भक्कम आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत भाजपचा बालेकिल्ला एकतर्फी विजय प्राप्त करून
प्रथम फेरीपासून आघाडी
चंद्रशेखर बोबडे - नागपूर
विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघात भाजपचे उमेदवार अनिल सोले यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली मतांची भक्कम आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत भाजपचा बालेकिल्ला एकतर्फी विजय प्राप्त करून कायम राखला. विशेष म्हणजे रिंगणातील एकाही प्रमुख उमेदवाराला सोलेंना मिळालेल्या मतांच्या जवळपासही जाता आले नाही. त्यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस होती.
हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असला तरी पक्षाचे नेते नितीन गडकरी रिंगणात नसल्याने पक्षाला बालेकिल्ला राखणे सोपे जाणार नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. विशेष म्हणजे भाजपचे बंडखोर महेंद्र निंबार्तेही रिंगणात असल्याने मतविभाजनाचा धोका होता. निंबार्ते नागपूर विद्यापीठाच्या राजकारणात अनेक वर्षांपासून सक्रिय होते. प्रतिस्पर्धी उमेदवार बबन तायवाडे तर गेल्या पाच वर्षांपासून निवडणुकीच्या तयारीला लागले होते. यावेळी त्यांना काँग्रेसने अधिकृत उमेदवारी देऊन पक्षाचे पाठबळ त्यांच्यामागे उभे केले होते. तिसरे प्रतिस्पर्धी किशोर गजभिये यांना बसपाने पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे लढत तिरंगी आणि चुरशीचीही होईल, असेच चित्र वर्तविण्यात येत होते.
ंफेरीनिहाय प्रमुख उमेदवारांची मते
उमेदवार प्रथम दुसरी तिसरी चौथीपाचवी
अनिल सोले १३०२१ १२७११ १२५७२ ११९७० २२११
बबन तायवाडे ४९४५, ५३०८ ५५५४ ४५३६८८३
किशोर गजभिये ४३५५ ४२६५ ४१७६ ५७३० ९२९