शिक्षकेतर कर्मचारीही आमचे ‘गुरु’
By admin | Published: July 19, 2016 04:23 AM2016-07-19T04:23:35+5:302016-07-19T04:23:35+5:30
हल्लीच्या जमान्यात सोशल मीडीयावर मेसेज आणि फोटोस् पाठविले की, गुरुपौर्णिमा साजरी झाल्याचे मानले जाते.
रामेश्वर जगदाळे,
मुंबई- हल्लीच्या जमान्यात सोशल मीडीयावर मेसेज आणि फोटोस् पाठविले की, गुरुपौर्णिमा साजरी झाल्याचे मानले जाते. मात्र अशाच इंटरनेटच्या जाळ््यात अडकलेल्या तरुणाईने हीच गुरुपौर्णिमा आगळ््या वेगळ््या ढंगात साजरी केली आहे. चर्चगेट येथील जयहिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबत गुरुपौर्णिमा साजरी केली आहे.
शाळा असो महाविद्यालय गुरुपौर्णिमा म्हटली की, प्रोफेसर्स आणि शिक्षकांना एखादे फूल देऊन किंवा केवळ शुभेच्छा देऊन साजरी केली जाते. मात्र जयहिंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी गुरुपौर्णिमा साजरी केली. त्यात गुरुदक्षिणा म्हणून महिला कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांनी नथ भेट दिली, आणि पुरुष कर्मचाऱ्यांना गांधी टोपी दिली. तसेच, या सगळ््यांना भेटकार्ड देऊनही शुभेच्छा दिल्या.
या महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी आपल्या प्राध्यापकांना पोस्टकार्डच्या माध्यमातूनही भेटवस्तू पाठविणार आहेत. यंगस्टर्सने राबविलेल्या या हटके आयडियाचे महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि प्राचार्यांनी कौतुक केले. याविषयी, मराठी वाड्मय प्रमुख प्रा. ज्युतिका सातघर यांनी सांगितले की, हा उपक्रम शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वेगळा ठरला. काही कर्मचारी याप्रसंगी भावूकही झाले, त्यामुळे हा उपक्रम अविस्मरणीय ठरला आहे. (युवा प्रतिनिधी)