एकाच रात्री ३ महिलांची प्रसुती जुळ्या मुलींची ‘नॉर्मल डिलेव्हरी’

By Admin | Published: October 21, 2016 08:26 PM2016-10-21T20:26:13+5:302016-10-21T20:31:37+5:30

एखादया कुटुंबातील महिलेची डिलेव्हरी जवळ आल्यावर त्या कुटुंबांना दोन प्रश्न भेडसावत राहतात. एक म्हणजे डिलेव्हरी नॉर्मल होते कि सिझर करावे लागेल?

Normal delivery of twins for delivery of 3 women on one night | एकाच रात्री ३ महिलांची प्रसुती जुळ्या मुलींची ‘नॉर्मल डिलेव्हरी’

एकाच रात्री ३ महिलांची प्रसुती जुळ्या मुलींची ‘नॉर्मल डिलेव्हरी’

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २१ - एखादया कुटुंबातील महिलेची डिलेव्हरी जवळ आल्यावर त्या कुटुंबांना दोन प्रश्न भेडसावत राहतात. एक म्हणजे डिलेव्हरी नॉर्मल होते कि सिझर करावे लागेल?  आणि सिझेरीअनसाठी खाजगी दवाखान्यात किती खर्च येईल? जर शासकीय अधिकारी व कर्मचाज्यांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावल्यास या दोन्ही प्रश्नांची सोडवणुक सहज होऊ शकते. मंगरुळपीर तालुक्यातील सनगाव या गावात २० आॅक्टोंबरच्या रात्री याची प्रचिती आली. येथील आरोग्य सेविकी पंचशिला साहेबराव दामले आणि कमल गोविंद इंगोले यांनी एकाच रात्री ३ महिलांची प्रसुती केली. यापौकी एका महिलेला जुळे मुले जन्माला आली आहेत. तीन्ही माता आणि त्यांच्या ४ बाळांची प्रकृती चांगली असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे. या आरोग्य सेविकांचे व इतर आरोग्य अधिकारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील कौतूक केले .
 
मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाºया सनगाव या उपकेंद्रात  २० आॅक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास चंदा प्रदिप पवार या रामगड येथील महिलेची तर सायंकाळी ७ वाजता प्रियंका श्याम जाधव या शेगी येथील महिलेची साधारण प्रसुती झाली.
 
या दोघींची ही प्रसुतीची दुसरी वेळ होती. याच दरम्यान एक गुंतागुतीची प्रसुती (हाय रिस्क) सुध्दा याच उपकेंद्रात वरील आरोग्य सेविकांनी यशस्वीरित्या पार पाडली. सायंकाळी ६ ते ७ यावेळात कासोळा येथील प्रतिमा अमोल चव्हाण या महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. वेळ कमी असल्यामुळे या महिलेला इतरत्र संदर्भीत (रेफर) न करता अत्यंत शिताफीने या महिलेची प्रसुती करण्यात आली. यामधील एका बाळाचे वजन कमी भरल्यामुळे बाळास तात्काळ वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. प्रशांत वाघमारे हे सनगाव उपकेंद्रास भेट देण्यासाठी आले असल्यामुळे या प्रसुती त्यांच्या देखरेखीमध्ये व्यवस्थित पार पडल्या.
 
मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल मेहकरकर यांनी डॉ. वाघमारे, आरोग्यसेविका पंचशिला दामले, कमल इंगोले, मनोरमा भालेराव आणि आशा, रुग्णवाहिकेचे वाहन चालक यांच कौतूक केले . अशाप्रकारे तत्पर सेवा मिळाल्यास ग्रामिण भागातील रुग्णांची चांगली सुविधा होईल आणि वेळ आणि पौशाचीही बचत होईल असा विश्वास जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Normal delivery of twins for delivery of 3 women on one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.