सर्वसामान्य त्रस्त, नोटा बदलण्यासाठी बँकांबाहेर लांब रांगा
By admin | Published: November 10, 2016 09:31 AM2016-11-10T09:31:17+5:302016-11-10T10:23:03+5:30
10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत नोटा बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - काळा पैसा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाचे देशवासियांनी स्वागत करत त्यांचे कौतुकही केले. मात्र, या निर्णयामुळे नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यात मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी आजपासून बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत. 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत नोटा बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे.
नोटा बदलून घेण्यासाठी बँकांबाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहायला मिळते आहे. मुंबईसह देशभरात हेच चित्र पाहायला मिळत आहे. येत्या शनिवार आणि रविवारदेखील बँका सुरू असणार आहेत. दरम्यान, नोटांच्या बदल्यात केवळ 100 रुपयांच्या नोटा मिळतील, अशी अपेक्षा करू नये. याबदल्यात चिल्लरही मिळू शकतात, असे आवाहन बँकांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. नोटा बदलून घेण्यासाठी बँकेकडे ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, दलालांचा सुळसुळाट होऊ नये, यासाठी बँकांबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच दलालांकडून पैसे बदलून न घेता बँक, पोस्ट ऑफिसमधूनच आपले पैसे बदलून घ्यावेत, असे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.
देशभरात एटीएम आजही बंद
दरम्यान देशभरात आजही एटीएम बंद असणार आहेत. यामुळे बँकांवर मोठ्या प्रमाणात भार पडतो आहे.
मुंबईतील भायखळा येथील 'बँक ऑफ महाराष्ट्र' सकाळी 10.30 वाजता उघडणार आहे. यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (फोटो - चेतन ननावरे)
डोंबिवली पूर्व येथील 'बँक ऑफ इंडिया'बाहेर लोकांची गर्दी (फोटो - संदीप प्रधान)
पनवेलमधील 'बँक ऑफ महाराष्ट्र'बाहेर नागरिकांची गर्दी (फोटो - भालचंद्र जुमलेदार)
पनवेलमधील पोस्ट ऑफिसबाहेर नागरिकांची गर्दी (फोटो - भालचंद्र जुमलेदार)
नांदेडमधील बँकाबाहेरही सकाळी आठ वाजल्यापासून नागरिकांनी नोटा बदलण्यासाठी गर्दी केली आहे. (फोटो - सचिन मोहिते)
याच प्रमाणे औरंगाबाद, अमरावतीसह संपूर्ण राज्यात, देशभरात बँकाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आहे.
दरम्यान, पुण्यातील कर्वे रोडवरील 'बँक ऑफ महाराष्ट्र'बाहेर नोटा बदलण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, बँकेत पैसेच नसल्याने ठेवीदारींचा हिरमोड झाला आहे.
Delhi: People queue up in large nos outside banks to deposit/exchange ₹500/1000 notes aftr Govt withdraws higher denomination currency notes pic.twitter.com/E2cpmiZg2A
— ANI (@ANI_news) 10 November 2016
Kolkata: People throng banks as it reopens today for the first time after Govt scraps Rs 500/1000 notes; queue up to deposit/exchange notes pic.twitter.com/nfeWB2Uxud
— ANI (@ANI_news) 10 November 2016
Mumbai: People queue up outside banks to exchange scrapped notes after Govt announcement to withdraw Rs 500/1000 notes pic.twitter.com/bfFrO0oqRe
— ANI (@ANI_news) 10 November 2016