उत्तर भारतीय विरुद्ध उत्तर भारतीय हाणामारी
By admin | Published: April 29, 2015 05:19 PM2015-04-29T17:19:37+5:302015-04-29T17:19:37+5:30
जोगेश्वरी येथे उत्तर भारतीय फेरीवाल्यांना उत्तर भारतीय तरुणांनीच मारहाण केली आहे. या प्रकरणी मनसेने राडा केल्याचे सांगितले जात असताना पोलिसांनी हे मनसेचे आंदोलन नसल्याचे म्हटले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - जोगेश्वरी येथे उत्तर भारतीय फेरीवाल्यांना उत्तर भारतीय तरुणांनीच मारहाण केली आहे.
या प्रकरणी मनसेने राडा केल्याचे सांगितले जात असताना पोलिसांनी हे मनसेचे आंदोलन नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मारहाणीत ताब्यात घेतलेल्या सहा जणांपैकी पाचजण हे उत्तर भारतीय आहेत. त्यातील एक मनविसेचा कार्यकर्ता असून हा वाद उत्तर भारतीयांमधील दोन गटातला असल्याचे सांगण्यात येत आहे. मनसे नेत्यांना विचारले असता, याप्रकरणी एक मनविसेचा कार्यकर्ता असला तरीही या प्रकरणाचा पक्षासोबत कोणताही संबंध नसून हे प्रकरण मनसेच्या नावे खपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनसेचे कार्यकर्ते आंदोलनानंतर पोलिसीकारवाईला सामोरे जातात पळूनजात नाहित असेही मनसे पदाधिका-यांनी सांगितले आहे.