छटपूजेसाठी उत्तर भारतीयांची गर्दी

By admin | Published: November 7, 2016 12:57 AM2016-11-07T00:57:16+5:302016-11-07T00:57:16+5:30

सुख, शांती, समाधान लाभावे, या उद्देशाने उत्तर भारतीय बांधवांच्या वतीने पवना नदीकिनारी मनोभावे छटपूजा केली. हजारो आबालवृद्ध या पूजेसाठी

North Indians crowd for satsang | छटपूजेसाठी उत्तर भारतीयांची गर्दी

छटपूजेसाठी उत्तर भारतीयांची गर्दी

Next

पिंपरी : सुख, शांती, समाधान लाभावे, या उद्देशाने उत्तर भारतीय बांधवांच्या वतीने पवना नदीकिनारी मनोभावे छटपूजा केली. हजारो आबालवृद्ध या पूजेसाठी उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
शहरातील चिंचवड, दापोडी, देहूरोड, निगडी, चिखली, मोशी परिसरातून उत्तर भारतीय छटपूजेसाठी नदीकिनारी एकत्र आले होते. रविवारी सायंकाळी साडेपाचनंतर महिलांनी सूर्यदेवताला अर्घ्य दिले़ नदीकिनारी नैवेद्य दाखवून सूर्यदेवताची मनोभावे पूजा केली़ पारंपरिक पद्धतीने शनिवारपासून चार दिवसांच्या या व्रताची सुरुवात झाली आहेक़ेळीची खुंटे, अखंड ऊस, सूप, गोड रोटी, फ ळे, अगरबत्ती, तुपाची अखंड तेवणारी समई, धूप असे साहित्य घेऊन महिलांनी नदीकाठी गर्दी केली होती़ उत्तर भारतीयांमध्ये प्रमुख असलेल्या उत्सवामध्ये छटपूजेला विशेष: महत्त्व आहे़ हनुमान मित्र मंडळ छटपूजा समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते़
छटपूजेसाठी उपवास केला जातो़ उपवासाच्या पहिल्या दिवशी महिलांकडून संपूर्ण घराची स्वच्छता केली जाते़ उपवास काळात एकही दिवस मिठाचे पदार्थ खाल्ले जात नाही़ सोमवारी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन उपवासाची सांगता होणार आहे़ छटपूजेसाठी आलेले प्रमोद व उषा पटेल हे दाम्पत्य १० वर्षांपासून महाराष्ट्रात छटपूजा करीत असल्याचे त्यांनी सांगितले़ छटपूजेची तयारी करताना महाराष्ट्रीय लोक खूप मदत करतात, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
दिवाळीनंतर मोठ्या आतुरतेने उत्तर भारतीय छटपूजा उत्सवाची वाट पाहत असतात़ सूर्यदेवतेला नैवेद्य दाखवून परिवाराच्या सुख-समाधानासाठी प्रार्थना केली जाते़ प्राचीन क ालखंडात भगवान
रामासाठी सीतामाईने छटपूजा केल्याची आख्यायिका असल्याची माहिती रामचंद्र व अंजू महासेठ
यांनी दिली.(प्रतिनिधी)


छटपूजा पारंपरिक उत्सव पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती़ या वेळी अलाहाबाद येथून कामानिमित्त आलेल्या रिंकी यादव, विनया यादव यांनी छटपूजेचा वेगळाच आनंद आल्याचे सांगितले. रविवारी सायंकाळी साडेचारनंतर पवना नदीकिनारी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती़ रस्त्यावर अनेक ठिकाणी मोटार आणि दुचाकींची अस्ताव्यस्त पार्किंग केल्यामुळे या मार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती़

Web Title: North Indians crowd for satsang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.