उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा.पी.पी.पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2016 07:14 PM2016-10-25T19:14:18+5:302016-10-25T19:14:18+5:30

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी उमविच्या स्कूल आॅफ फिजीकल सायन्सेसचे माजी संचालक प्रा.पी.पी.पाटील यांची निवड झाली आहे.

North Maharashtra University's Vice Chancellor Prof.P.P. Patil | उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा.पी.पी.पाटील

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा.पी.पी.पाटील

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 25 - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी उमविच्या स्कूल आॅफ फिजीकल सायन्सेसचे माजी संचालक प्रा.पी.पी.पाटील यांची निवड झाली आहे. याबाबतची घोषणा मंगळवारी दुपारी राजभनातून करण्यात आली. उद्या, बुधवार, २६ आॅक्टोबर रोजी प्रा.पाटील हे कुलगुरुपदाचा पदभार प्रभारी कुलगुरु तथा विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याहस्ते सकाळी ११ वाजता स्वीकारणार आहेत.
राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या सहीचे पत्र मुुंबई येथील राजभवनातून इ-मेलद्वारे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागास प्राप्त झाले. हे पत्र सायंकाळी प्रा.पाटील यांना सुपूर्द करण्यात आले. प्रा.पाटील यांच्या रुपाने विद्यापीठाच्या एखाद्या प्रशाळेतील (कॅम्पस) व्यक्तीला प्रथमच कुलगुरू होण्याचा मान मिळाला आहे. ते उमविचे सहावे कुलगुरू आहे.
२० आॅक्टोबर रोजी राज्यपाल यांनी राजभवनात कुलगुरूपदासाठी प्रा.पाटील यांच्यासह प्रा.आर.डी. कुलकर्णी, प्रा.डी.जी. हुंडीवाले, प्रा.ए.एम. महाजन या चार जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या, त्यानंतर राज्यपाल त्याच दिवशी सायंकाळी तामिळनाडूकडे रवाना झाले होते. त्यामुळे कुलगुरू यांच्या नावाची घोषणा २० रोजी झाली नव्हती. नंतर सुट्ट्या आल्याने सोमवारी कुलगुरू यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र राज्यपाल हे सोमवारी शिर्डी, नाशिक दौऱ्यावर होते. ते दुपारी मुंबईत राजभवनात परतले. पण त्यांच्याकडून कुलगुरू नियुक्तीसंबंधीचे पत्र सोमवारीही जारी झाले नाही. अखेर मंगळवारी कुलगुरू यांच्या नावाची घोषणा झाली.
प्रा.पाटील हे एकनाथ डवले यांच्याहस्ते सकाळी ११ वाजता पदभार स्वीकारणार आहेत.हा कार्यक्रम उमविच्या अधिसभा सभागृहात होणार आहे.

Web Title: North Maharashtra University's Vice Chancellor Prof.P.P. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.