मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 09:55 AM2020-02-03T09:55:33+5:302020-02-03T10:02:53+5:30

सामनाचे संपादक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे.

Not from the back door, came from 'roof crack'; Reply of Uddhav Thackeray's to Bjp | मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

Next
ठळक मुद्देठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न नव्हते, असे स्पष्ट केले.मी नेहमी सांगतो, जबाबदारीतून मी कधी पळ काढलेला नाही आणि काढणार नाही. मी काय धर्मांतर केलंय? आणि तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व असं ब्रह्मवाक्य आहे की काय?

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिल्याने शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीने मुख्यमंत्रीपद मिळविले. यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. आता येत्या 4 महिन्यांत ठाकरेंना विधानसभा किंवा विधानपरिषदेतून निवडून जावे लागणार आहे. विरोधक त्यांची मागच्या दारातून येणार अशी खिल्ली उडवत आहेत. यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. 


सामनाचे संपादक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. यामध्ये राऊत यांनी ठाकरेंना प्रश्न विचारला होता. यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न नव्हते, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री होण्याआधी मी त्या विधान भवनात आयुष्यात दोन-चार वेळेहून अधिक गेलो नसेन. असं देशात अपवादात्मक परिस्थितीत झालं असेल की, एखादी व्यक्ती जी तिकडे येण्याचं कधी स्वप्न नव्हतं ती व्यक्ती येते तेच मुख्यमंत्री म्हणून. मी नेहमी सांगतो, जबाबदारीतून मी कधी पळ काढलेला नाही आणि काढणार नाही. त्यामुळे कुणालाही न दुखावता जे शक्य असेल ते मी करेन, असे ठाकरे म्हणाले. 


यानंतर विधानसभेतून की परिषदेतून निवडणूक लढविणार या राऊतांच्या प्रश्नाला त्यांनी विधानपरिषदेचे संकेत दिले आहेत. राज्यात आता लगेचच विधानपरिषदेच्या निवडणुका येतील. विधानसभेवर जायचे म्हणजे जो निवडून आला त्याला राजीनामा द्यायला लावून पुन्हा निवडणूक घ्यावी लागले. यामुळे माझ्यावरील जबाबदारी पार पाडण्यासाठी विधानसभेतून कुणालाही न दुखावता परिषदेत जाऊ शकत असेन तर का नाही जायचं? मागल्या दारातून, या दारातून, त्या दारातून हे सगळं बोलायला ठीक आहे. मग मी तर म्हणेन, मी छपरातून आलो आहे, असे उत्तर ठाकरे यांनी दिले. 
ही राज्यघटननेच निर्माण केलेली व्यवस्था आहे. यामुळे कोणत्याही दारातून नाही तर, मी वरून पडलोय…छपरातून, असे उत्तर विरोधकांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी दिले. 

मी काय धर्मांतर केलंय? आणि तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व असं ब्रह्मवाक्य आहे की काय? की घटनेत लिहिलंय की, हे म्हणतील तेच हिंदुत्व. आपण म्हणजे सर्वज्ञानी, सर्वव्यापी असा आव कुणी आणू नये. आपण म्हणतो तेच खरं आणि बाकीचे म्हणतील ते झूठ हा हास्यास्पद दावा आहे. त्यांच्यापुरता हा दावा त्यांनी त्यांच्या कार्यालयात करायला हरकत नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
 

Web Title: Not from the back door, came from 'roof crack'; Reply of Uddhav Thackeray's to Bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.