नाते पाहून नाही, तर गुण पाहून उमेदवारी दिली: जयंत पाटील; शरद पवार गटाची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 01:38 PM2024-10-25T13:38:12+5:302024-10-25T13:40:18+5:30

"आमच्याकडे इनकमिंग जोरदार होते, मात्र आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही. त्यामुळे मोजक्याच लोकांना प्रवेश व मोजक्याच लोकांना उमेदवारी आहे"

Not by relationship, but by merit says Jayant Patil as List of Sharad Pawar group announced | नाते पाहून नाही, तर गुण पाहून उमेदवारी दिली: जयंत पाटील; शरद पवार गटाची यादी जाहीर

नाते पाहून नाही, तर गुण पाहून उमेदवारी दिली: जयंत पाटील; शरद पवार गटाची यादी जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: शरद पवार गटाची ४५ जागांची पहिली यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी येथे जाहीर केली. जयंत पाटील यांच्यासह माजी मंत्री राजेश टोपे यांना उमेदवारी मिळाली आहे. आम्ही नाते पाहून नाही तर गुण पाहून उमेदवारी दिली, असे पाटील म्हणाले. जयंत पाटील म्हणाले, ही पहिली यादी आहे. अन्य जागांवरील नावे लवकरच निश्चित होतील. मुंबईतून पुढील यादी जाहीर करण्यात येईल. आमच्याकडे इनकमिंग जोरदार होते, मात्र आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही. आम्ही कपडे दगडावर धुतो. त्यामुळे मोजक्याच लोकांना प्रवेश व मोजक्याच लोकांना उमेदवारी आहे.

मुख्यमंत्रिपदाचा आमच्याकडे विषयच नाही. निवडणुकीनंतर एकत्र बसून त्याबाबत निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढणयासाठी आम्ही लढत आहोत. आघाडीमध्ये जागावाटपावरून कोणताही वाद नसून आमचा संयुक्त जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

४४ चे गणित विचारताच जाहीर केली ४५वी जागा

बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देताना काय निकष लावले, यावर पाटील म्हणाले ते तरुण आहेत, संयमी आहेत, अभ्यासू आहेत, सुशिक्षित आहेत. लोकांना त्यांची उमेदवारी हवी होती. एकूण ४४ जागा पाटील यांनी जाहीर केल्या होत्या. ४४ चे गणित काय या प्रश्नांवर त्यांनी लगेच ४५ वी जागा जाहीर करतो असे सांगत हडपसर विधानसभेसाठी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे नाव जाहीर केले.


    उमेदवाराचे नाव - मतदारसंघ

१) जयंत पाटील    इस्लामपूर    विद्यमान आमदार 
२) अनिल देशमुख    काटोल    विद्यमान आमदार
३) राजेश टोपे    घनसांगवी    विद्यमान आमदार 
४) बाळासाहेब पाटील    कराड उत्तर    विद्यमान आमदार
५) जितेंद्र आव्हाड    मुंब्रा कळवा    विद्यमान आमदार 
६) शशिकांत शिंदे    कोरेगाव    विद्यमान विधानपरिषद आमदार 
७) जयप्रकाश दांडेगावकर    वसमत    माजी आमदार
८) गुलाबराव देवकर    जळगाव ग्रामीण    माजी आमदार
९) हर्षवर्धन पाटील    इंदापूर    भाजपमधून प्रवेश 
१०) प्राजक्त तनपुरे    राहुरी    विद्यमान आमदार 
११) अशोकराव पवार    शिरुर    विद्यमान आमदार
१२) मानसिंगराव नाईक    शिराळा    माजी आमदार
१३) सुनील भुसारा    विक्रमगड    विद्यमान आमदार
१४) रोहित पवार    कर्जत जामखेड    विद्यमान आमदार 
१५) विनायकराव पाटील    अहमदपूर    भाजपमधून प्रवेश
१६) राजेंद्र शिंगणे    सिंदखेड राजा    विद्यमान आमदार
        अजित पवार गटातून प्रवेश 
१७) सुधाकर भालेराव    उदगीर    माजी आमदार-भाजपमधून प्रवेश
१८) चंद्रकांत दानवे    भोकरदन    माजी आमदार-भाजपमधून प्रवेश 
१९) प्रदीप नाईक    किनवट    माजी आमदार
२०) विजय भांबळे    जिंतूर    माजी आमदार
२१) पृथ्वीराज साठे    केज     माजी आमदार
२२) संदीप नाईक    बेलापूर    माजी आमदार-भाजपमधून प्रवेश 
२३) बापूसाहेब पठारे    वडगाव शेरी    माजी आमदार-भाजपमधून प्रवेश
२४) दिलीप खोडपे    जामनेर     नवीन चेहरा-भाजपमधून प्रवेश
२५) रोहिणी खडसे    मुक्ताईनगर    नवीन चेहरा
२६) सम्राट डोंगरदिवे    मूर्तिजापूर    नवीन चेहरा
२७) दिनेश्वर पेठे    नागपूर पूर्व    नवीन चेहरा
२८) रविकांत गोपचे    तिरोडा    नवीन चेहरा
२९) भाग्यश्री आत्राम    अहेरी (नवीन चेहरा)    अजित पवार गटातून प्रवेश    
३०) रुपकुमार ऊर्फ बबलू चौधरी    बदनापूर    नवीन चेहरा
३१) सुभाष पवार    मुरबाड    शिंदेसेनेतून प्रवेश-नवीन चेहरा 
३२) राखी जाधव    घाटकोपर पूर्व    नवीन चेहरा 
३३) देवदत्त निकम    आंबेगाव     नवीन चेहरा 
३४) युगेंद्र पवार    बारामती    नवीन चेहरा 
३५) संदीप वरपे    कोपरगाव    नवीन चेहरा
३६) प्रताप ढाकणे    शेवगाव    माजी आमदार पुत्र
३७) राणी लंके    पारनेर    खासदार पत्नी-नवीन चेहरा
३८) मेहबूब शेख    आष्टी    नवीन चेहरा
३९) नारायण पाटील    करमाळा    शिंदेसेनेतून प्रवेश-माजी आमदार
४०) महेश कोठे    सोलापूर शहर उत्तर    नवीन चेहरा
४१) प्रशांत यादव    चिपळूण    नवीन चेहरा
४२) समरजित घाटगे    कागल    भाजपमधून प्रवेश 
४३) रोहित आर. पाटील    तासगाव     नवीन चेहरा 
४४) चरण वाघमारे     तुमसर    माजी आमदार-भाजपमधून प्रवेश
४५) प्रशांत जगताप    हडपसर    नवीन चेहरा

Web Title: Not by relationship, but by merit says Jayant Patil as List of Sharad Pawar group announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.