सेनापती नव्हे, सैनिकांच्या बळावर!
By Admin | Published: October 1, 2014 01:56 AM2014-10-01T01:56:17+5:302014-10-01T01:56:17+5:30
लोकसभा निवडणुकीत 18 जागांवर विजय मिळाल्याने यावेळी विधानसभेवर भगवा फडकेल या अपेक्षेने शिवसैनिकांत उत्साह संचारला होता.
>लोकसभा निवडणुकीत 18 जागांवर विजय मिळाल्याने यावेळी विधानसभेवर भगवा फडकेल या अपेक्षेने शिवसैनिकांत उत्साह संचारला होता. मात्र ऐनवेळी भाजपाने धक्का दिल्याने शिवसैनिक मनापासून दुखावला आहे. असा बिथरलेला, संतापलेला शिवसैनिक जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतो तेव्हा तो तळहातावर शिर घेऊन लढतो. काल-परवार्पयत आपल्या उमेदवारांना ‘अगोदर मटणाचं पाहा, तर धनुष्यबाणाच्या बटणाचं सांगतो असं सांगणारा शिवसैनिक पुन्हा जिंकण्याकरिता मैदानात उतरू शकतो. शिवसेनेची हीच ताकद आहे.
संजय राऊत
सामनाचे कार्यकारी संपादक असलेल्या राऊत यांना जेव्हा शिवसेनेतर्फे राज्यसभेच्या खासदारक्या उप:यांना धडाधड दिल्याबद्दल टीका होऊ लागली, तेव्हा तिला वेसण घालण्यासाठी मराठी व निष्ठावंत अशा उमेदवाराला संधी द्यायची म्हणून राज्यसभेची उमेदवारी दिली गेली. तेव्हा त्यांचे राजकीय महत्त्व वाढले. नंतर ते शिवसेनेचे दिल्लीतील जणू काही प्रवक्तेच बनले होते. अलीकडे शिवसेनेच्या मुखपत्रतून व्यक्त होणारी मते व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मते यामध्ये वरचेवर तफावत आढळते.
आदित्य ठाकरे
ठाकरे कुटुंबाच्या चवथ्या पिढीचे प्रतिनिधी. काँग्रेसच्या घराणोशाहीला विरोध करणा:या ठाकरे यांच्या घरातील हे तरुण नेतृत्व. आदित्य यांच्याकरिता शिवसेनेने युवा सेनेची स्थापना केली आणि भारतीय विद्यार्थी सेनेचा कारभार गुंडाळला. शिवसेनेने सोशल मीडियात सध्या घेतलेल्या आघाडीचे श्रेय्य आदित्य व त्यांच्या टीमला जाते. उद्धव यांच्या प्रकृतीच्या मर्यादा लक्षात घेता विधानसभा निवडणुकीत आदित्य यांनाच प्रचाराची मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल.
मनोहर जोशी
दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर, मधुकर सरपोतदार हे जुने नेते कालवश झाले, तर छगन भुजबळ, नारायण राणो, राज ठाकरे हे करिष्मॅटिक नेते संघटनेबाहेर गेले. त्यामुळे सेनेची मदार मनोहर जोशींवर होती. सुधीर जोशी असाह्य झालेत, त्यामुळे जोशींवर जबाबदारी मोठी होती. परंतु राज ठाकरेंशी त्यांची असलेली व्यावसायिक भागीदारी व जवळीक यामुळे ते उद्धवजींच्या नजरेतून उतरले. मध्यंतरी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनी केलेली हाराकिरी त्यांच्या अंगाशी आली. त्यामुळे आता त्यांची अवस्था उरलो उपकारापुरता, अशी झाली आहे.
उद्धव ठाकरे
शिवसेनाप्रमुखांचे चिरंजीव, शिवसेनेचे पक्षप्रमुख आक्रमकता आणि वक्तृत्व यामध्ये शिवसेनाप्रमुखांची धार नाही. परंतु वारशामुळे पद मिळाले आहे. सुसंस्कृत आणि संयमी नेतृत्व अशी ख्याती. जनतेला व श्रोत्यांना खिळवून ठेवणा:या वक्तृत्वाचा अभाव. संघटनेवर शिवसेनाप्रमुखांची जशी मजबूत पकड होती तशी पकड नाही. जुने सहकारी सांभाळणो व नवे सहकारी जोडणो, यात फारसे यश नाही. आता तर भाजपासारखा मित्र गुरावला दुरावला.
सुभाष देसाई : शिवसेनेचे मॅनेजर, अशी त्यांची प्रतिमा आहे. मास्टर प्लॅनर म्हणून ते विख्यात आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या ते अत्यंत विश्वासातले. त्यांच्या निर्वाणानंतर उद्धवजींशी ज्यांनी जुळवून घेतले, अशा जुन्या नेत्यांत देसाईंचे अग्रस्थान आहे. शिवसेनेची स्ट्रॅटेजी तेच ठरवत असतात. वक्तृत्व प्रभावी नसले तरी नियोजन आणि व्यवस्थापन यात ते मास्टर मानले जातात.
चंद्रकांत खैरे : शिवसेनेच्या अंतस्थ वतरुळात फारसे महत्त्व नसले तरी अनेकदा आमदार, महाराष्ट्राचे गृहनिर्माण आणि परिवहनमंत्री म्हणून बजावलेली कामगिरी व अनेकदा खासदारकी मिळवली म्हणून खैरे हे मराठवाडय़ाचे शिवसेनेतील मातब्बर नेते मानले जातात. वक्तृत्व आणि नेतृत्व फारसे प्रभावी नसले तरी बुरूड समाजातील नेते आणि मराठवाडय़ातील गड सांभाळणारे म्हणून त्यांचे शिवसेनेत स्थान आहे.
अनंत गीते : ठाकरे कुटुंबीयांच्या विश्वासातील जुने नेते म्हणून गीतेंचे नाव व स्थान शिवसेनेत मोठे आहे. बेस्ट कमिटीचे अध्यक्षपद तीन वेळा सलग भुषवणारे ते पहिले शिवसेना नेते होते. शिवसेनेचा कोकणातील चेहरा व ओबीसींचे शिवसेनेतील नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा आहे. ते वाजपेयी सरकारमध्ये मंत्रीही होते. शिवसेनेचा कोकणातील ढासळणारा गड सावरण्याची कामगिरी ते यथाशक्ती बजावत आहेत.
अनिल देसाई : शिवसेनेच्या संघटनात्मक बाबीत महत्वपूर्ण कामगिरी बजावतात. भाजपाबरोबरच्या जागावाटपाच्या चर्चेत सातत्याने सहभागी. संयमी, मितभाषी नेता अशी ओळख. उद्धव यांच्या स्वभाव प्रकृतीशी उत्तम टय़ुनिंग जुळल्यानेच राज्यसभेवर पाठवून शक्ती देण्यात आली.
मिलिंद नाव्रेकर : शिवसेनेवर नाराज होऊन बाहेर पडणारी प्रत्येक व्यक्ती नाव्रेकर यांच्यावर टीका करते. नाव्रेकर यांच्यावर होणारी ही टीका त्यांचे उद्धव यांच्याजवळील स्थान बळकट करीत आले. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा अनेक पक्षातील नेत्यांशी उत्तम संबंध राखून शिवसेना व त्या पक्षांमधील दुवा म्हणून काम केले. शिवसेनेला आर्थिक ताकद देणारे निर्णय त्यांच्याच माध्यमातून होतात, अशी चर्चा आहे.
नीलम गो:हे : एकेकाळी रिपाइंत असलेल्या नीलम गो:हे शिवसेनेत आल्या आणि त्यांना लगेच आमदारकी मिळाली. आज स्त्री-विश्वातला शिवसेनेचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. प्रसारमाध्यमांतून शिवसेनेची बाजू खंबीरपणो त्या मांडत असतात. उत्तम वक्तृत्व आणि नेतृत्व क्षमता हा त्यांचा विशेष आहे. उद्धवजींचा विश्वास ही त्यांची अॅसेट आहे.
अशी ही शिवसेना
प्रारंभीच्या काळात एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शरद पवार, रामराव आदिक, अरुण मेहता असे नेतेही सेनेच्या व्यासपीठावर. शिवसेनेचे बोधचिन्ह असलेला वाघ शिवसेनाप्रमुखांनीच चितारला. प्रारंभी 2क् टक्के राजकारण आणि 8क् टक्के समाजकारण हा बाणा होता.
एकीकडे कम्युनिस्टांचा कामगार चळवळीवरील प्रभाव नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिस्पर्धी कामगार संघटना शिवसेनेने भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून साकारली.
दत्ताजी साळवी, छगन भुजबळ, दत्ताजी नलावडे, चंद्रकांत पडवळ यासारखे बहुजन समाजातील नेते सेनेने घडवले. सोशल इंजिनीअरिंगचा भारतातील पहिला प्रारंभ सेनेचे घडवला. ओबीसींच्या राजकीय महत्त्वाकांक्षा जागवून व त्या यथाशक्ती पूर्ण करून तिनेच त्यांचे महत्त्व वाढवले.
मराठी माणसाच्या अधिकारासाठी झुंज देणो, हा जनतेच्या किती जिव्हाळ्याचा विषय आहे, हे परळ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक महाराष्ट्रातील सर्व पक्ष विरुद्ध शिवसेना अशी लढत असतानाही जिंकून शिवसेनेने आपले राजकीय सामथ्र्य सिद्ध केले. कधी काँग्रेस तर कधी समाजवादी, कधी जनता पक्ष तर कधी भाजपा, अशा पक्षांना संधी मिळेल तसे वापरून घेऊन सेनेने आपला राजकीय प्रभाव वाढवला.
शिवसेनाप्रमुखांनी आपल्या नेतृत्वाचा वरचष्मा कायम ठेवला. नेतृत्वाचा करिष्मा वाढवण्यासाठी त्यांनी जनमताला भुरळ टाकतील अशा प्रश्नांचा सतत पाठपुरावा केला. हिंदी चित्रपटांवर दक्षिणोत बहिष्कार टाकला जाताच दक्षिणोतल्या निर्मात्यांनी तयार केलेल्या हिंदी चित्रपटांवर त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात बंदी घातली. तेव्हा मय्यपन आणि एम. करुणानिधी धापा टाकत त्यांच्या भेटीला मुंबईला आले होते.
करिष्मा वाढवण्यासाठी त्यांनी आपल्या संरक्षणार्थ निर्माण केलेला भगवा गार्ड हा सगळ्यांच्या असूयेचा विषय होता. एकीकडे व्यावहारिक मुद्दे आणि दुसरीकडे भावनिक मुद्दे यांची सांगड घालणारे राजकारण शिवसेनेने अचूकपणो केले. बजाव पुंगी हटाव लुंगी असो की, गर्व से कहो हम हिंदू हैं नारा असो, की गँगस्टरसुद्धा हिंदूंचेच पाहिजे अशी केलेली गजर्ना असो, ही त्याचीच उदाहरणो आहेत.
शिवसेनेने अनेक धक्के पचवले, तरीही..
शिवसेनेने आपल्या 48 वर्षाच्या कारकीर्दीत अनेक धक्के पचवले आहेत. त्यामुळे भाजपाने निवडणुकीच्या तोंडावर दिलेला काडीमोड शिवसेनेला हादरवणारा असला तरी मूळावर आघात करणारा नाही. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात बळवंत मंत्री, सुधाकर लोणो, बंडू शिंगरे, डॉ. हेमचंद्र गुप्ते, दत्ता प्रधान, अरुण दाभोळकर, माधव देशपांडे, विलास गुंडेवार, अशोक देशमुख असे अनेक साथीदार बाळासाहेबांना सोडून गेले. बंडू शिंगरे यांनी प्रतिशिवसेना काढून तर माधव देशपांडे यांनी अनेक घणाघाती आरोप करून शिवसेनाप्रमुखांना लक्ष्य केले. मात्र ते निष्प्रभ ठरले. छगन भुजबळ यांनी 18 आमदारांसह केलेले बंड हे शिवसेनेच्या कारकीर्दीतील सर्वात मोठे बंड ठरले. बाळासाहेब ठाकरे यांना थेट आव्हान देऊन त्यांच्या ‘लखोबा या टीकेला ‘टी बाळू असे प्रत्युत्तर देणारा दुसरा नेता तोर्पयत निपजला नव्हता. त्यानंतर गणोश नाईक यांनीही शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या नेतृत्वाच्या सुरुवातीच्या काळात नारायण राणो यांच्या बंडाचा सामना करावा लागला. भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या विरोधात बंड केले तेव्हा शिवसैनिक भुजबळ यांचा शोध घेत होते आणि भुजबळ भूमिगत झाले होते. मात्र राणो यांनी उद्धव यांच्या विरोधात बंड केले तेव्हा राणो यांचे समर्थक शिवसैनिकांना मारहाण करीत असल्याचे शिवसेनेच्या आतार्पयतच्या चारित्र्याशी विपरीत चित्र रस्त्यावर दिसले. राज ठाकरे यांनी शिवसेनेला केलेला ‘जय महाराष्ट्र बाळासाहेब व शिवसैनिकांना वेदनादायी होता. आता भाजपाने साथ सोडल्याने शिवसेनेने जुना मित्रही गमावला आहे. याखेरीज 1971 च्या लोकसभा निवडणुकीत सरकारी कर्मचा:यांवर शिवसेनाप्रमुखांनी केलेल्या टिप्पणीमुळे मनोहर जोशी, दत्ता प्रधान यांच्यासह काही उमेदवार पराभूत झाले होते. 1978 च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेबांनी कोळी समाजावर टीका केली आणि शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. 1975 साली शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला तर 198क् च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले. 1979 मध्ये मुस्लीम लीगबरोबर केलेली युती हा तर शिवसेनेवर एक डाग ठरला.
गिरणी कामगारांचा 1981 साली संप झाला. तत्पूर्वी या कामगारांनी डॉ. दत्ता सामंत यांचे नेतृत्व स्वीकारु नये याकरिता बाळासाहेबांनी केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. दक्षिणोकडील द्रमुक अथवा अण्णाद्रमुक, उत्तरेकडील समाजवादी पार्टी अथवा राष्ट्रीय जनता दलास स्वबळावर सत्ता संपादन करण्याची संधी मिळाली तशी ती शिवसेनेला स्थापनेपासून आजतागायत मिळाली नाही ही त्या पक्षाच्या कारकीर्दीतील ठळक उणीव आहे.
बलस्थानं
च्48 वर्षाची संघटनात्मकदृष्टय़ा मजबूतीची परंपरा
च्उद्धव ठाकरे यांचे संघटन कौशल्य
च्मुंबई, ठाणो, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद महापालिकांमधील सत्ता
च्मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाची भूमिका
च्शहरांबरोबर ग्रामीण भागात जनाधार
च्स्थानीय लोकाधिकार समिती, भारतीय कामगार सेना अशा
संघटनांचे पाठबळ
च्युवासेनेसारख्या संघटनेच्या माध्यमातून जोडलेला तरुण
च्नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे उचललेले पाऊल
च्लोकसभा निकालाने दुणावलेला विश्वास
च्युती तुटल्याने पेटलेला शिवसैनिक
कमकुवत दुवे
च्उद्धव ठाकरे यांचे प्रभावहीन वक्तृत्व
च्दुस:या फळीतील प्रभावी नेतृत्वाचा अभाव
च्नारायण राणो, राज ठाकरे यांच्यासारखे तगडे विरोधक
च्भाजपाकडून टीकेचे लक्ष्य केले जाण्याची भीती
च्विधिमंडळातील विरोधी पक्ष म्हणून प्रभावशून्य कामगिरी
च्सर्वच्या सर्व जागा लढवताना होणारी दमछाक
च्भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या तुलनेत कमकुवत आर्थिक ताकद
च्प्रतिस्पर्धी पक्षातील करिष्मा व वक्तृत्व असलेले नेतृत्व
च्अन्य पक्षातून उमेदवारी मिळवलेले स्वपक्षीय
च्मुख्यमंत्रीपदाच्या सक्षम उमेदवाराचा व मंत्रीपदाकरिता अनुभवी मंडळींचा अभाव
विधानसभेतील यश-अपयशाचा
आलेख
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सहा महिने अगोदर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यात सत्ता आल्यास शेतक:यांना मोफत वीज पुरवठा करण्याची घोषणा केली. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लागलीच मोफत वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आणि राज्यात पुन्हा दोन्ही काँग्रेसची सत्ता आली. शिवसेनेच्या जागा सातने घसरून 62 झाल्या तर भाजपाची संख्या दोनने कमी होऊन 54 झाली. सत्तेपासून युती अधिक दूर गेली.
राज्यात सत्ता येत नसल्याने शिवसेना-भाजपामधील दुरावा वाढत गेला. प्रमोद महाजन यांची हत्या व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रकृती अस्वास्थ यामुळे युतीमधील एकजिनसीपणा कमी झाला. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रिंगणात असल्याने व राज ठाकरे यांची सुप्त लाट महिला व युवा वर्गात असल्याने शिवसेनेचे 45 तर भाजपाचे 47 आमदार निवडून आले.
राज्यात साडेचार वर्षे सत्तेत राहिल्यानंतर भाजपाच्या आग्रहाखातर सहा महिने अगोदर निवडणूक घेण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. सत्तेच्या काळात बबन घोलप, शोभाताई फडणवीस, दौलतराव आहेर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांनी केले होते. खुद्द मुख्यमंत्री मनोहर जोशी हे पुण्यातील जावयाच्या एका बेकायदा टॉवरच्या प्रकरणात दोषी ठरल्याने त्यांना निवडणुकीपूर्वी पदावरून दूर केले होते. यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जागा चारने कमी होऊन 69 झाल्या तर भाजपाला 1क् जागांवर फटका बसून त्यांची संख्या 56 झाली. जनमताचा हा कौल युतीच्या विरोधात होता.
अयोध्येतील बाबरी मशिद 1992 साली पाडली गेली. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत भीषण बॉम्बस्फोट झाले. त्यामुळे शिवसेनेने जहाल हिंदुत्ववादी भूमिका घेतली. त्या पाश्र्वभूमीवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 73 आमदार विजयी झाले.
शिवसेनेने 1987 मध्ये हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर डॉ. रमेश प्रभू यांची पोटनिवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने स्वीकारला. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर धार्मिक प्रचार केल्याबद्दल ठपका आला. त्यामुळे 1989 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चार खासदार विजयी झाले व 199क् साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 52 आमदार विधानसभेत गेले.
उद्धव ठाकरे हे संघटनात्मक कामात पक्के असले तरी वक्ते म्हणून कच्चे आहेत. शिवाय त्यांना प्रकृतीमुळे मर्यादा आहेत. मनोहर जोशी अडगळीत पडले आहेत. रामदास कदम डावलले गेल्याने नाराज आहेत. सुभाष देसाई हे सर्वदूर स्वीकारार्ह नेते नाहीत. त्यामुळे दिवाकर रावते, संजय राऊत, नीलम गो:हे या नेत्यांच्या खांद्यावर आता प्रचाराची धुरा राहील. आदित्य ठाकरे व त्यांची युवासेना या निवडणुकीत मोठी भूमिका बजावू शकते. अनिल देसाई, मिलींद नाव्रेकर यांच्या मुत्सद्दीपणाचा कस लागणार आहे. शिवसेनेच्या या टीमला भाजपामधील नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्याशी किंवा राष्ट्रवादीमधील शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे अशा मातब्बर नेत्यांच्या, वक्त्यांच्या संघाशी दोन हात करावे लागतील. अशावेळी शिवसेनेची बाळासाहेबांच्या काळात झालेली घट्ट बांधणीच शिवसेनेला या कठीण परिस्थितीतून वाचवू शकते.
उद्धव ठाकरे यांनी महाबळेश्वर येथील 2क्क्3 मध्ये झालेल्या शिवसेनेच्या शिबिरात पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आणि शिवसेनेतील वातावरण ढवळून निघाले. त्याचीच परिणती 2क्क्5 मध्ये नारायण राणो यांच्या बंडात झाली तर 2क्क्6 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र केला. या कालावधीत झालेल्या 2क्क्4 व 2क्क्9 च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा आलेख घसरता राहिला. शिवसेना आणि भाजपामधील संवाद संपुष्टात येऊन त्याला संघर्षाचे स्वरुप याच कालावधीत आले.
लोकसभेच्या 2क्14 मधील निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व भाजपाला लाभले आणि महाराष्ट्रात भाजपाचे 23 खासदार विजयी झाले. यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्म्याकडे आशेने पाहणा:या भाजपाला बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेबद्दल ममत्व ठेवण्याचे कारण उरले नव्हते. अगोदरच आलेला दुरावा व त्यामध्ये मित्रची उपयुक्तता संपल्याची झालेली जाणीव या वातावरणात जागावाटपाचा वाद चिघळला. शिवसेनेकडील जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेल्या मातब्बर नेत्यांना भाजपाने प्रवेश देऊन युतीला कडेलोटाकडे नेते आणि अगदी मोक्याच्या क्षणी मित्रला टकमक टोकावरून ढकलून दिले.
उद्धव ठाकरे यांनी महाबळेश्वर येथील 2क्क्3 मध्ये झालेल्या शिवसेनेच्या शिबिरात पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आणि शिवसेनेतील वातावरण ढवळून निघाले. त्याचीच परिणती 2क्क्5 मध्ये नारायण राणो यांच्या बंडात झाली तर 2क्क्6 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र केला.
लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व भाजपाला लाभले आणि महाराष्ट्रात भाजपाचे 23 खासदार विजयी झाले. यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्म्याकडे आशेने पाहणा:या भाजपाला बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेबद्दल ममत्व ठेवण्याचे कारण उरले नाही.
लेखाजोखा संदीप प्रधान