२४ तास उलटूनही निधीची भेट नाही; नातेवाईकांची धडपड
By admin | Published: March 26, 2016 02:03 AM2016-03-26T02:03:42+5:302016-03-26T02:03:42+5:30
ब्रसेल्स विमानतळावर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात जखमी झालेल्या निधी चाफेकर यांना तेथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृति स्थिर असल्याच्या
मुंबई : ब्रसेल्स विमानतळावर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात जखमी झालेल्या निधी चाफेकर यांना तेथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृति स्थिर असल्याच्या वृत्तानंतर तिचे पती राजेश यांनी गुरुवारी रुग्णालय गाठले. मात्र २४ तास उलटूनही त्यांची निधीसोबत भेट झालेली नाही.
अंधेरी येथील चकाला परिसरात राहणारी निधी ब्रसेल येथील हल्ल्यात त्या जखमी झाल्या आहेत. या अपघातात त्या भाजल्या असल्याने त्यांना बर्न वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. त्या वॉर्डमधील रुग्णांना भेटीसाठीचे नियम असल्याने गुरुवार पासून तेथे थांबलेल्या पतीची अद्याप भेट झालेली नाही. दुसरीकडे वृत्त वाहिन्यांंवर प्रकृति स्थिर असतानाही गंभीर असल्याचे वृत्त दाखवत असल्यामुळे त्यांची चिंता वाढत असल्याचे निधीची नातेवाईक माधुरी निलेश चाफेकर यांनी सांगितले.