तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो...; ऑडिओ क्लिप व्हायरल होताच रामदास कदम म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 06:34 PM2021-10-02T18:34:37+5:302021-10-02T18:36:49+5:30

मनसेकडून रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल; कदम यांचं आरोपांवर स्पष्टीकरण

not gave any information to kirit somaiya shiv sena leader ramdas kadam clarifies | तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो...; ऑडिओ क्लिप व्हायरल होताच रामदास कदम म्हणतात...

तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो...; ऑडिओ क्लिप व्हायरल होताच रामदास कदम म्हणतात...

Next

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांनी गेल्या काही महिन्यांत शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सातत्यानं आरोप करून सोमय्यांनी त्यांना वारंवार अडचणीत आलं आहे. परब यांच्यावर तुटून पडलेल्या सोमय्यांना शिवसेनेच्याच बड्या नेत्याचा रस पुरवल्याचा आरोप आता राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. याशिवाय मनसेच्या नेत्यानं सोमय्या आणि कदम यांच्या ऑडिओ क्लिपदेखील समोर आणल्या आहेत.

प्रसाद कर्वे नावाचा एक माहिती अधिकार कार्यकर्ता परब यांच्याविरोधात किरीट सोमय्यांना सगळी माहिती पुरवतो, कारवाईसाठी पाठपुरावा करतो आणि मग हाच कार्यकर्ता सगळ्या अपडेट्स शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना पुरवतो, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे. संजय कदम यांचे आरोप रामदास कदम यांनी फेटाळले आहेत.

ती ऑडिओ क्लिप खोटी; अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार- कदम
मनसेच्या वैभव खेडेकरांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. त्यात कोणतंही तथ्य नाही, असं म्हणत कदमांनी आरोप फेटाळून लावले. माझ्या मुलाविरुद्ध विधानसभा निवडणुकीत संजय कदम पराभूत झाले. तेव्हापासून ते सातत्यानं माझ्यावर आरोप करत आहेत. वैभव खेडेकरांच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली. त्यामुळे माझी बदनामी करण्यासाठी ते असे आरोप करतात. मी आधीच त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे आणि आता पुन्हा मानहानीचा दावा करणार आहे, असं कदम म्हणाले.

तुळजाभवानीची शप्पथ घेऊन सांगतो...
संजय कदम आणि वैभव खेडेकर आधी शिवसेनेतच होते. मग ते इतर पक्षात गेले. त्यांचा राजकीय बाप मीच आहे. खेडेकर यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली. त्यामुळे त्यांचं नगराध्यक्ष जाऊ शकतं. ते वाचवण्यासाठी राष्ट्रवादीला हातीशी घेऊन ते माझ्यावर आरोप करत आहेत. तुळजाभवानीची शप्पथ घेऊन सांगतो, मी सोमय्यांशी संपर्क साधलेला नाही. जो माणूस माझ्या पक्षाच्या मुळावर उठलाय, त्याला पत्रकार परिषदेनंतर मला भेटायला घेऊन ये असं मी का बरं म्हणेन, असा सवाल रामदास कदमांनी उपस्थित केला. 

Web Title: not gave any information to kirit somaiya shiv sena leader ramdas kadam clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.