मद्यनिर्मितीच नव्हे, रोजगारही महत्त्वाचा - खडसे

By admin | Published: April 22, 2016 04:02 AM2016-04-22T04:02:32+5:302016-04-22T04:02:32+5:30

मद्यनिर्मितीच नव्हे तर, तेथील रोजगारदेखील महत्त्वाचा आहे़ केवळ एक बाजू पाहून चालणार नाही, सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घेतला जाईल

Not only alcohol, employment is also important - Khadse | मद्यनिर्मितीच नव्हे, रोजगारही महत्त्वाचा - खडसे

मद्यनिर्मितीच नव्हे, रोजगारही महत्त्वाचा - खडसे

Next

अहमदनगर : मद्यनिर्मितीच नव्हे तर, तेथील रोजगारदेखील महत्त्वाचा आहे़ केवळ एक बाजू पाहून चालणार नाही, सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असे सांगून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पुरविल्या जाणाऱ्या पाण्याबाबत ठोस भूमिका घेण्याचे टाळले़
महसूलमंत्री खडसे गुरुवारी नगर दौऱ्यावर पत्रकारांशी बोलत होते़ खडसे म्हणाले, सर्व बाजंूनी विचार होणे गरजेचे आहे़ मात्र पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे़ कुठेही पाणी कमी पडणार नाही़ वाट्टेल ते करू, प्रत्येकाला पाणी मिळेल याची
सरकार व्यवस्था करेल, असे सांगायलाही ते विसरले नाहीत़
हा धागा पकडून खडसे यांनी राज्यातील साखर कारखान्यांनी वापरलेल्या पाण्याबाबतही टिप्पणी केली. ते म्हणाले, लातूर येथील विलासराव देशमुख यांच्या कारखान्याने मांजरा धरणातील पाणी वापरले़ ते पाणी कारखान्याने वापरले नसते, तर लातूर शहरावर जलसंकटच ओढावले नसते.

Web Title: Not only alcohol, employment is also important - Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.