बांधावर नव्हे, कागदावरच लढणार

By admin | Published: November 9, 2015 03:28 AM2015-11-09T03:28:19+5:302015-11-09T03:28:19+5:30

एकरकमी एफआरपी देणे शक्य असलेल्या कारखान्यांनीच हंगाम सुरू करावा. कारखानदार पहिला हप्ता किती देतात आधी बघू, त्यानंतर आंदोलनात उतरू. आता बांधावर नव्हे कागदावरच लढणार

Not only on bunds, but also on paper | बांधावर नव्हे, कागदावरच लढणार

बांधावर नव्हे, कागदावरच लढणार

Next

कोल्हापूर : एकरकमी एफआरपी देणे शक्य असलेल्या कारखान्यांनीच हंगाम सुरू करावा. कारखानदार पहिला हप्ता किती देतात आधी बघू, त्यानंतर आंदोलनात उतरू. आता बांधावर नव्हे कागदावरच लढणार, असे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
‘स्वाभिमानी’ने जयसिंगपूरच्या ऊस परिषदेमध्ये साखर कारखाने चालू करण्यास परवानगी दिली. त्यांनी कारखानदारांना एक महिन्याची मुदत दिली आहे. पाटील यांची भूमिका जाणूनघेतली असता ते म्हणाले, ‘कायद्याने एकरकमी एफआरपी दिली पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे. आम्ही साखर आयुक्तांना तसे निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांना एकरकमीच एफआरपी मिळाली पाहिजे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भूमिका आहे.
आम्ही उसाचे पहिले बिल बघू, एकरकमी दिले तर ठीक अन्यथा कायद्याची लढाई करू, असा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Not only on bunds, but also on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.