फक्त निवडणुकीच्या सभाच नाही तर सावरकरांवरील भाषणेही पावसात भिजत होतात : शरद पोंक्षे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 05:12 PM2019-12-26T17:12:53+5:302019-12-26T17:27:22+5:30

केवळ शत्रूचा शत्रू म्हणून मित्र होतात ती मैत्री कधीच टिकत नाही..

Not only election meetings but Savarkar's speeches soak in the rain: Sharad Ponkshe | फक्त निवडणुकीच्या सभाच नाही तर सावरकरांवरील भाषणेही पावसात भिजत होतात : शरद पोंक्षे

फक्त निवडणुकीच्या सभाच नाही तर सावरकरांवरील भाषणेही पावसात भिजत होतात : शरद पोंक्षे

Next
ठळक मुद्देनिगडी प्राधिकरणमध्ये ' सावरकर विचार दर्शन' या विषयावर आयोजित व्याख्यानस्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी असंख्य गैरसमज पसरवले गेले

पिंपरी : फक्त इलेक्शनच्या सभा भिजत होत नाहीत, तर सावरकरांवरील भाषणेही पावसात भिजत होतात, अशी जोरदार फटकेबाजी अभिनेते व सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांनी बुधवारी (दि. २५) निगडी प्राधिकरण येथे केली. केवळ शत्रूचा शत्रू म्हणून मित्र होतात ती मैत्री कधीच टिकत नाही. ती मैत्री तत्कालिक असते. समान धागे असतील तरच मैत्री टिकते, अशा शब्दांत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. सावरकरांचे विचार आचरणात आणले नाहीत म्हणूनच आज देशाची ही अवस्था झाली आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजप, सावरकर प्रेमी व अमोल थोरात युथ फाऊंडेशनच्या वतीने निगडी प्राधिकरणमध्ये सावरकर विचार दर्शन या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आण्णाभाऊ साठे अर्थिक महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व शहर सरचिटणीस अमोल थोरात यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निगडी, प्राधिकरण येथील खानदेश मित्र मंडळ कार्यालयाच्या मैदानावर आयोजित या व्याख्यानाला सावरकर प्रेमींची तुफान गर्दी झाली होती. कार्यक्रमाच्या शेवटी शेवटी पावसाने हजेरी लावली. विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे पावसात भिजत केलेल्या भाषणाचा उल्लेख न करता अभिनेते शरद पोंक्षे यांनी फक्त इलेक्शनच्या सभा भिजत होत नाहीत, तर सावरकरांवरील भाषणेही पावसात भिजत होतात, अशी टिप्पणी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि खसखस पिकली. सावरकरांवरील विचार मांडताना त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही अप्रत्यक्षपणे भाष्य केले. केवळ शत्रूचा शत्रू म्हणून मित्र होतात ती मैत्री कधीच टिकत नाही. ती मैत्री तत्कालिक असते. लोकशाही राष्ट्रामध्ये एका विशिष्ट मयार्देपर्यंत अल्पसंख्यांकांना महत्त्व आहे हे आम्हीही मान्य करतो. पण तेच महत्त्व लक्षात घेऊन राज्यकर्ते शासन करायला लागले तर मात्र त्या देशाचे फक्त वाटोळे होते. ज्या देशातल्या बहुसंख्य माणसांचा अनादर केला जातो ते राष्ट्र कधीही मोठे होऊ शकत नाही,

 

 

 

Web Title: Not only election meetings but Savarkar's speeches soak in the rain: Sharad Ponkshe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.