विवाहितेची आत्महत्या नव्हे, खून केल्याचा आरोप

By Admin | Published: December 26, 2016 06:24 PM2016-12-26T18:24:54+5:302016-12-26T19:53:02+5:30

हतनूर कॉलनीतील युक्ता चेतन सोनार (वय २४) या विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दुसऱ्या दिवशीही नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला.

Not the suicide of Married, but the murder of the murderer | विवाहितेची आत्महत्या नव्हे, खून केल्याचा आरोप

विवाहितेची आत्महत्या नव्हे, खून केल्याचा आरोप

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 26 - हतनूर कॉलनीतील युक्ता चेतन सोनार (वय २४) या विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दुसऱ्या दिवशीही नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. ही आत्महत्या नसून खूनच असल्याचा आरोप करुन दोषीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नातेवाईकांनी केली. चार तासाच्या गोंधळानंतर इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी युक्ताचा मृतदेह धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी विवाहितेचा पती, सासू, सासरा व मामसासरा या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
युक्ता सोनार यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली होती. गळफास घेतल्याच्या संशयावरुन प्रथमदर्शनी या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविवारी रात्री विवाहितेचा पती चेतन सोनार व त्याचा मामा कांतीलाल सोनार या दोघांना जिल्हा रुग्णालयात मारहाण झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळीही नऊ वाजेपासून नातेवाईकांनी युक्ताचा पती व सासरच्यांना रुग्णालयात बोलवा, पतीच्याच हस्ते अग्निडाग देऊ, अशी भूमिका घेतल्याने वातावरण चिघळले होते.
वातावरण चिघळल्याचे पाहून रामानंद नगर, जिल्हा पेठ, जळगाव शहर व निर्भया पथक घटनास्थळी दाखल झाले होते. सहायक निरीक्षक अरविंद भोळे, सारिका कोडापे यांनी नातेवाईकांची समजूत घातली, मात्र जळगावात शवविच्छेदनास त्यांनी नकार दिला. दोरीने गळा आवळून युक्ताचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांकडून होत होता. त्यामुळे वातावरण तापले.

डॉक्टरांकडून शवविच्छेदनास नकार
पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी पुन्हा नातेवाईकांशी चर्चा करून समजूत घातली. त्यानंतर जळगावातच शवविच्छेदनाचा निर्णय झाला, परंतु नातेवाईकांकडून डॉक्टरांवरही आरोप होण्याच्या भीतीने डॉक्टरांनी जळगावात शवविच्छेदन करण्यास नकार दिला, त्यामुळे धुळे येथे मृतदेह रवाना करण्यात आला. मृतदेहासोबत काही कर्मचारी पाठविण्यात आले.

आरोप होऊ नये म्हणून डॉक्टरांनीही जळगावात शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्याकडून लेखी घेतल्यानंतर मृतदेह धुळे येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, त्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल.
-प्रवीण वाडिले, पोलीस निरीक्षक

Web Title: Not the suicide of Married, but the murder of the murderer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.