नोटबंदीचा ड्रग्ज तस्करांनी घेतला धसका

By Admin | Published: November 16, 2016 05:58 AM2016-11-16T05:58:35+5:302016-11-16T05:58:35+5:30

ड्रग्जचा व्यवहार हा पूर्णपणे रोखीने चालतो. त्यात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचा वापर अधिक असतो. चलनातून या नोटाच रद्द झाल्याने या तस्करांवर संकट

The note-taking drugs can be taken by smugglers | नोटबंदीचा ड्रग्ज तस्करांनी घेतला धसका

नोटबंदीचा ड्रग्ज तस्करांनी घेतला धसका

googlenewsNext

मुंबई : ड्रग्जचा व्यवहार हा पूर्णपणे रोखीने चालतो. त्यात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचा वापर अधिक असतो. चलनातून या नोटाच रद्द झाल्याने या तस्करांवर संकट ओढावल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे काही प्रमाणात हा धंदा थंडावल्याने पोलिसांसह अमली पदार्थविरोधी पथकाने सुटकेचा निश्वास सोडलेला दिसून आला. गेल्या दहा महिन्यांत १ कोटी ७२ लाख १८ हजार ३०० रुपये किमतीचे ड्रग्ज अमली पदार्थविरोधी पथकाने जप्त केले आहेत. व्यवहारातून अचानक पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने तस्करांनीही धसका घेतला आहे. नोटाबंदीमुळे तस्करांना जुन्या नोटा स्वीकारणे शक्य नसल्याने त्यांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पैसे देऊन अमली पदार्थ विकत घेणारे आणि देणारे या दोघांवरही सध्या संकट ओढावल्याने अमली पदार्थविरोधी पथकानेही थोडासा सुटकेचा नि:श्वास सोडलेला दिसून आला. हेरॉईन, कोकेनच्या तस्करीत पुढे असलेल्या नायजेरियन तस्करांचीही तारांबळ उडालेली दिसून आली.
पूर्वी झोपडपट्टी परिसरातील मजूरवर्ग भट्टीवरील दारूला अधिक पसंती द्यायचे. त्यात अवघ्या १०० ते २०० रुपयांमध्ये गांजा उपलब्ध होतो. त्यात पाच ते सहा जणांमध्ये एक चिलीम पेटवून त्यात गांजा टाकला तरी सहज सर्वांची गरज भागायची. आजही गोवंडी, मानखुर्द, भांडुप सोनापूर, शिवडी, मशीद बंदर, धोबीघाट अशा भागांमध्ये गांजाचा धुरांडा कायम आहे. मात्र हा धुरांडा कायम असतानाच कमी पैशात जास्त नशा अनुभवण्यासाठी तरुणाईसह सामान्य मजूर हा एमडीच्या जाळ्यात ओढला गेला. पूर्वी सिगारेट म्हटली की मॉडर्न राहणीमानाचे प्रतीक मानले जात होते. कालांतराने आधुनिकतेबरोबर नशेचा टे्रण्डही बदलला. याच सिगारेटची जागा कोकेन आणि हेरॉइनने घेतली. हायप्रोफाइल पार्ट्यांमध्ये कोकेन, एलएसडी, मेथ, हेरॉईन, बटन याचा वापर केला जातो. याचा व्यवहार हा पूर्णपणे रोखीनेच होत असल्याने तस्करांचा धंदा तेजीत सुरू होता. मात्र नोटाबंदीमुळे हा व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेला दिसून येत आहे. त्यामुळे आणखीन काही दिवस हेच चित्र पाहावयास मिळणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकाऱ्याने लोकमतला दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The note-taking drugs can be taken by smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.