नोटबंदी : जेवण करा, पैसे जमेल तेव्हा द्या
By admin | Published: November 15, 2016 05:24 PM2016-11-15T17:24:33+5:302016-11-15T20:10:23+5:30
चलनातील जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलानातून बाद करण्याच्या निर्णय जाहीर झाल्यानंतर सामान्य माणसांपासून ते पैशावाल्यांचीही तारांबळ उडली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 15 - चलनातील जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलानातून बाद करण्याच्या निर्णय जाहीर झाल्यानंतर सामान्य माणसांपासून ते पैशावाल्यांचीही तारांबळ उडली आहे. सुट्या पैशांचा अभावातून नवीन आलेली दोन हजार रुपयांची नोटही कोणी घेईना, अशातच खाण्या-पिण्याची अबाळ होणे ही प्रत्येकांची सामूहिक समस्या झाली होती. परंतु, मुंबई आग्रा हायवेवरील दहावा मैल परिसरातील हॉटेल रिलॅक्स कॉर्नरच्या मालकांनी या सामूहिक समस्यांनी ग्रासलेल्या नागरिकांप्रती सहानुभूती दाखवत ‘हजार, पाचशेच्या नोटांची चिंता सोडा, जेवण करा आणि पैसे तुम्हाला जमेल तेव्हा द्या’ असे फलक लावले आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल रिलॅक्स शाकाहारी फॅमिली गार्डन रेस्टॉरंटमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी बँक खात्यावर रक्कम जमा करण्याचा, डेबीट, क्रेडीट कार्डने बील देण्याचा पर्याय उपलबद्ध असतानाही हॉटेलच्या संचालकांनी प्रवासातील नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला आहे. प्रवासात असणाºया नागरिकांनी सुटे पैसे नाहीत म्हणून कोणताही विचार न करता येथे पोटभर जेवन करा आणि पुन्हा या मार्गावरून परताना पैसे द्या, असे आवाहन हॉटेलच्या संचालकांनी केले आहे. हॉटेलचा हा निर्णय कौतुकास्पद असून सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली नाही तर नवलच! केवळ जून्या नोटेमुळे कोणी उपाशी राहू नये, हा साधा विचार या हॉटेलने केला आहे. त्यामुळे अनेकांची किमान जेवणाची समस्या तरी दूर झाली. गेल्या मंगळवारी मध्यरात्रीपासून या नोटा चलनातून बाद झाल्याने व्यवसायिकांनी या नोटा स्वीकारण्यास नकार दिला होता. पण नंतर राज्यसरकारने आदेश दिल्यानंतर काही ठिकाणी नोटा स्विकारल्या जात असल्या तरी सर्वसामान्य प्रवास्यांची समस्या दूर करण्यासाठी अशाप्रकारे समाजातील विविध घटकांनी पुढे येण्याची गरज व्यक्त होत आहे.
ज्यांच्याकडे ५०० आणि १००० रु पयांच्या नोटा आहेत त्यांनी जेवणाची चिंता करू नये. निसंकोच मनाने जेवण करून घ्यावे अणि पुढच्या वेळी बिलाचे पैसे द्यावे. ज्यांच्याकडे मोठ्या रकमेच्या नोटा आहेत. त्यांचा प्रश्न आम्ही सोडविण्याचा प्रयत्न करतो. परंतु, ज्यांच्याकडे जुन्या नोटा आहेत. ते प्रवासी संकोच करतात. म्हणून आम्ही असे फलक लावून आवाहन केले आहे. व्यवहार महत्वाचा असला तरी शेवटी माणूसच माणचाच्या कामी येणार नाही तर मग कोण येणार
- भीमाबाई जोंधळे,संचालक, हॉटेल रिलॅक्स कॉर्नर, दहावा मैल.