खर्च सादर न करणाऱ्या १५ उमेदवारांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 07:15 PM2017-02-16T19:15:14+5:302017-02-16T19:15:14+5:30

खर्च सादर न करणाऱ्या १५ उमेदवारांना नोटीस

Notice to 15 candidates who did not submit the cost | खर्च सादर न करणाऱ्या १५ उमेदवारांना नोटीस

खर्च सादर न करणाऱ्या १५ उमेदवारांना नोटीस

Next

खर्च सादर न करणाऱ्या १५ उमेदवारांना नोटीस
सोलापूर : आॅनलाईन लोकमत
महापालिका निवडणुकीत मोठ्या उमेदीने निवडणूक रिंगणात उतरलेल्या १५ उमेदवारांना खर्च सादर न केल्यामुळे निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
महापालिकेच्या निवडणूक रिंगणात ६२३ उमेदवार आहेत. प्रचाराचा रंग भरू लागला आहे. सर्व प्रभागात चौरंगी, तिरंगी आणि दुरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. प्रचाराच्या धावपळीतून वेळ काढून उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी दररोज दुपारी निवडणूक कार्यालयात हजेरी लावून खर्च सादर करीत आहेत. गतवेळच्या निवडणुकीतील २६0 उमेदवारांना निवडणूक खर्च सादर न केल्यामुळे या निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे सध्या निवडणूक रिंगणात असलेले बहुतेक उमेदवार खर्च सादर करण्याच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. निवडणूक खर्च सादर करण्यासाठी आयोगाच्या विहित नमुन्यात दररोजच्या खर्चाचा अहवाल द्यावा लागत आहे. पण केवळ गंमत म्हणून निवडणूक लढविणारे १५ उमेदवार खर्च सादर करण्यासाठी अद्याप कार्यालयाकडे फिरकले नसल्याचे दिसून आले आहे. आयोगाच्या नियमानुसार तीन दिवसांपेक्षा जास्त दिवसात खर्च न आल्यास नोटीस बजाविण्यात येते. यातील १३ उमेदवारांना यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली तर दोन उमेदवारांना मंगळवारी नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.
असा आहे निवडणूक खर्च. उमेदवारास खर्च लावताना प्रत्येक गोष्टीनुसार आयोगाने भाड्याचे दर निश्चित केले आहेत. त्यामध्ये स्पीकर: २२00 रु., बॅटरी: ५५0, ट्यूबलाईट: ३५, हॅलोजन: ४४0, पंखा: ३३0, कुलर: ३५0 ते ५00, जनरेटर: १७00 ते ४000,फोकस: २५0, मंडप: २५0 स्क्वे. मीटर, सोफासेट: ४00, सतरंजी:२0, कारपेट: ४0, बेडशीट:२0, ड्रम:८0, पेन्डल: ५५0 (१0 बाय १0), खुर्ची (१00): ५५0, प्रोेजेक्टर: १२00 ते ५२00, होर्डिंग्ज: ४५ स्क्वे. फूट, कापडी बॅनर: ६५,प्रिंटिंग पोस्टर (२0बाय ३0): ३७00. मतदान कार्ड (१000): ५00, झेंडे: १२५ स्क्वे.मीटर, जीप: ३000, मिनी बस: ६५00, कार: २५00 ते ४000, रिक्षा: ७00,मोटरसायकल: १२0, ट्रॅक्टर: १२00.
-------------------------------------
चहापानावर जादा खर्च
आतापर्यंत उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चात मंडप, स्पीकर, कार्यालयीन चहापान, हॅन्डबिल, जेवण आदी खर्चावर भर दिला आहे. असा आहे हा खर्च. चहा: ५ ते १0 रु. कॉफी:२0, लस्सी: ३0, शीतपेय: ३0, स्नॅक्स: ३0, राईस प्लेट: ११0 ते १५0, पाणी पाऊच: ५, बाटली: २0, जार: ४५, फटाके: २५0 ते ५00, हार: १00, गुच्छ: २0. फुले (१00 किलो) : ३000 ते ६000.

Web Title: Notice to 15 candidates who did not submit the cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.