नाशिकसह २६ महापालिकांना नोटिसा, अपंग निधी खर्च करण्यात अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 03:28 AM2017-11-09T03:28:47+5:302017-11-09T03:28:52+5:30
राज्यभरातील महापालिकांमध्ये अपंग निधी खर्च होत नसल्याच्या तक्र ारींच्या आधारे अपंग कल्याण विभागाने नाशिक महापालिकेसह राज्यातील २६
नाशिक : राज्यभरातील महापालिकांमध्ये अपंग निधी खर्च होत नसल्याच्या तक्र ारींच्या आधारे अपंग कल्याण विभागाने नाशिक महापालिकेसह राज्यातील २६ महापालिकांना नोटिसा बजाविल्याची माहिती राज्य अपंग आयुक्त नितीन पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागांतर्गत अपंग कल्याणासाठी मनपांना निधी वर्ग केला. मात्र, अनेक महापालिकांनी हा निधी खर्च केला नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार अपंग कल्याण विभागाने २६ महापालिकांना कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत. त्यांच्याकडून अपंग निधी खर्च, नियोजन, योजनांबाबत १३ नोव्हेंबरपर्यंत खुलासा मागविला आहे. हा खुलासा प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. मनपा कार्यवाहीनंतर जिल्हा परिषद तसेच नगरपरिषदा, नगरपालिका यांना नोटिसा पाठवून माहिती मागविली जाणार असल्याची माहिती आयुक्त पाटील यांनी दिली.