प्राप्तिकर विभागाकडून ३०० जणांना नोटीस
By Admin | Published: March 1, 2017 12:30 AM2017-03-01T00:30:32+5:302017-03-01T00:30:32+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे ३०० जणांना प्राप्तिकर विभागाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे.
पिंपरी : नोटाबंदीच्या कालावधीत बँकांमध्ये जमा केलेल्या रोख भरण्याचा तपशील सादर करण्याबाबत पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे ३०० जणांना प्राप्तिकर विभागाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे जुन्या हद्दपार होणार असल्याने अनेकांनी मोठ्या प्रमाणात ही रोख रक्कम बँकेत जमा केली. त्या बदल्यात काही प्रमाणात नवीन नोटा घेतल्या यासह ही रक्कम तशीच ठेवली. मात्र, बँकेत जमा केलेल्या या रकमेचा आता तपशील सादर करावा लागणार आहे. त्यानुसार आता प्राप्तिकर विभागाने कारवाई सुरु केली आहे.
मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करणाऱ्यांकडून तपशील मागविण्यात आला आहे. यामध्ये सविस्तर माहिती सादर करावी लागणार आहे. नोटीस पाठविल्याचे कामकाज गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू आहे.प्राप्तिकर विभागाकडून सुरुवातीला ईमेल पाठविण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात लेखी पत्र पाठविण्यात येणार आहेत. यानंतर सविस्तर माहिती संकलित करून छाननी केली असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)