शोभा डे यांना विधिमंडळ सचिवांची नोटीस

By admin | Published: April 13, 2015 04:45 AM2015-04-13T04:45:54+5:302015-04-13T04:45:54+5:30

प्राइम टाइममध्ये मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट दाखवण्यासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत वादग्रस्त टिष्ट्वट करून हक्कभंगाची कारवाई

Notice of Legislature Secretary to Shobha De | शोभा डे यांना विधिमंडळ सचिवांची नोटीस

शोभा डे यांना विधिमंडळ सचिवांची नोटीस

Next

मुंबई : प्राइम टाइममध्ये मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट दाखवण्यासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत वादग्रस्त टिष्ट्वट करून हक्कभंगाची कारवाई ओढवून घेतलेल्या लेखिका शोभा डे यांना विधिमंडळाच्या सचिवांनी नोटीस पाठवली असून, सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांच्या वतीने आपण शोभा डे यांना नोटीस पाठवली असून, आठवडाभरात उत्तर देण्यास सांगितले आहे. डे यांना दोन दिवसांपूर्वी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट प्राइम टाइममध्ये दाखवण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात जाहीर केल्यानंतर डे यांनी आता मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्नऐवजी वडापाव व मिसळपाव खावा लागणार, असे टिष्ट्वट केले होते. शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली व शिवसैनिकांनी थेट त्यांच्या घरापर्यंत धडक मारून अांदोलन केले.
हक्कभंग प्रस्ताव दाखल झाल्यावर डे यांची टिष्ट्वटरवरील भाषा काहीशी मवाळ झाली. आपण मराठी असून, मराठी चित्रपटांबाबत आपल्याला प्रेम असल्याचे त्या बोलल्या होत्या. आता शोभा डे यांना आपल्या वक्तव्याबद्दल नोटिशीला उत्तर देताना स्पष्टीकरण द्यावे लागेल. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Notice of Legislature Secretary to Shobha De

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.