दरोडेच्या भाषणाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसला नोटीस
By admin | Published: February 8, 2017 03:28 AM2017-02-08T03:28:44+5:302017-02-08T03:28:44+5:30
ष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी सारसबागेजवळ महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाची सभा घेतली. या सभेमध्ये घनश्याम दरोडे या बालकास भाषण करण्यास लावल्याने निवडणूक आयोगाच्या
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी सारसबागेजवळ महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाची सभा घेतली. या सभेमध्ये घनश्याम दरोडे या बालकास भाषण करण्यास लावल्याने निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे, अशी तक्रार भाजपाचे कसबा प्रचारप्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांनी केली आहे.
या तक्रारीचा खुलासा राष्ट्रवादी काँगे्रसने करावा, अशी नोटीस विश्रामबागच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बजावली आहे.
निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार १८ वर्षांखालील मुलांना प्रचारात
सहभागी करून घेता येत नाही.
मात्र, राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत घनश्याम दरोडे या बालकाचे
भाषण ठेवण्यात आले, अशी
तक्रार भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. याचा खुलासा करण्याची नोटीस राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक राठी यांना पाठविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)