नितेश राणे यांना नोटीस
By admin | Published: June 14, 2016 03:40 AM2016-06-14T03:40:40+5:302016-06-14T03:40:40+5:30
चिंटू शेख गोळीबार प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने क्लोझर रिपोर्ट स्वीकारण्यास नकार दिल्याने सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी उच्च न्यायालयाने चिंटू शेखसह
मुंबई: चिंटू शेख गोळीबार प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने क्लोझर रिपोर्ट स्वीकारण्यास नकार दिल्याने सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी उच्च न्यायालयाने चिंटू शेखसह माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना नोटीस बजावली. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी २०१२ मध्ये खार येथील कार्यालयात गोळीबार केला, असा आरोप संघटनेचे कार्यकर्ते चिंटू शेख यांनी केला होता. तशी तक्रारही पवई पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती.
स्थानिक पोलीस दबावाखाली तपास करत आहेत, असा आरोप करत शेख यांनी याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयानेही याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला.
ठोस पुरावे नाहीत, असे म्हणत विशेष सीबीआय न्यायालयात क्लोझर रिपोर्ट दाखल केला. परंतु, २०१३ मध्ये विशेष न्यायालयाने सीबीआयला फटकारत राणेंविरुद्धची केस बंद करण्यास नकार दिला. शेख आणि राणे यांच्यात सामंजस्याने तोडगा निघाल्याने राणे यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.
याच दरम्यान सीबीआयने पुन्हा क्लोझर रिपोर्ट सादर केला. परंतु, न्यायालयाने पुन्हा एकदा क्लोझर रिपोर्ट स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.