IPL सामन्यादरम्यान ध्वनीप्रदूषण, BCCI, MCA ला हायकोर्टाची नोटीस

By admin | Published: July 18, 2016 06:27 PM2016-07-18T18:27:49+5:302016-07-18T18:27:49+5:30

२०१३ मध्ये मुंबईतील वानखेडे आणि पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर आयपीएलच्या सामन्यदरम्यान ध्वनी प्रदूषणाचे नियम तोडल्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयला हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे.

Notice of noise pollution, BCCI, MCA to High Court during IPL season | IPL सामन्यादरम्यान ध्वनीप्रदूषण, BCCI, MCA ला हायकोर्टाची नोटीस

IPL सामन्यादरम्यान ध्वनीप्रदूषण, BCCI, MCA ला हायकोर्टाची नोटीस

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ : २०१३ मध्ये मुंबईतील वानखेडे आणि पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर आयपीएलच्या सामन्यदरम्यान ध्वनी प्रदूषणाचे नियम तोडल्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयला हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने बीसीसीआय आणि एमसीएला यावर उत्तर देण्याचे आदेश दिल आहेत. या प्रकरणावरील पुढील सुनावणी १६ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
 
दरम्यान, मुंबईतील वानखेडे आणि पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर 2013 मध्ये रात्री 8 वाजता सामने सुरू करण्यात आले. मध्यरात्री पर्यंत लाऊड स्पीकर्सचा वापर करून एमसीए आणि बीसीसीआयने ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर १००कोटींचा दंड आकारावा अशी याचिका हायकोर्टात दाखल झाली आहे. त्या याचिकेवर सुनावनी करताना हायकोर्टाने बीसीसीआय, एमसीएला स्पष्टीकरण देण्याची नोटीस पाठवली आहे.

Web Title: Notice of noise pollution, BCCI, MCA to High Court during IPL season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.