दहा ठेकेदारांना नोटीस

By admin | Published: March 24, 2017 02:08 AM2017-03-24T02:08:27+5:302017-03-24T02:08:27+5:30

मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडताच रस्तेघोटाळा चौकशीच्या दुसऱ्या फेरीच्या अहवालानुसार कारवाई सुरू झाली आहे.

Notice to ten contractors | दहा ठेकेदारांना नोटीस

दहा ठेकेदारांना नोटीस

Next

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडताच रस्तेघोटाळा चौकशीच्या दुसऱ्या फेरीच्या अहवालानुसार कारवाई सुरू झाली आहे. दोनशे रस्त्यांचा पाया कमकुवत असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला असल्याने दहा ठेकेदारांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे.
रस्त्यांच्या कामांमध्ये अनियमितता असल्याचे उजेडात आल्यानंतर रस्ते कामांची चौकशी सुरू झाली. पहिल्या चौकशी फेरीने अनेक गौप्यस्फोट केले. यामध्ये कनिष्ठ अधिकाऱ्यापासून प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत चौकशी झाली. त्यात दक्षता खात्याचे प्रमुख, रस्ते विभागाचे तत्कालीन प्रमुख आणि दोन कार्यकारी अभियंते व थर्ड पार्टी आॅडिट कंपनीच्या २३ अभियंत्यांवर कारवाई झाली होती. आता दुसऱ्या फेरीत नोटीस पाठवलेल्यांना पंधरा ते वीस दिवासंमध्ये खुलासा करावा लागेल. (प्रतिनिधी)
१५ ते २० दिवसांमध्ये खुलासा करावा लागणार-
-कामामध्ये अनियमितता असल्याची तक्रार तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केल्यानंतर आयुक्तांनी चौकशी आदेश दिले होते. चौकशी समितीने पहिल्या टप्प्यात ३४ रस्त्यांची चौकशी करून अहवाल सदर केला.
-रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर यांचे निलंबन व अटक, दोन कार्यकारी अभियंत्यांना अटक, थर्डपार्टी आॅडिट कंपनीच्या २२ अभियंत्यांना अटक करण्यात आली. एकूण ३० जण अटकेत.
-के. आऱ कन्स्ट्रक्शन, महावीर इन्फ्रा, आरपीएस, आऱ के़ मदानी, जे़ कुमार, रेलकॉन या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे, नोंदणी रद्द करणे व त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्याची प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली आहे़.
-चौकशीच्या दुसऱ्या फेरीत दोनशे रस्त्यांचा पाया कमकुवत असल्याचे समोर आले. या रस्त्यांच्या कामामध्ये हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
-कारणे दाखवा नोटीस मिळाल्यानंतर १५ ते २० दिवसांमध्ये संबंधित ठेकेदाराला खुलासा करावा लागणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई होणार आहे.
या ठेकेदारांना पालिकेची नोटीस-
मे. रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्ट्स लि.
मे. महावीर रोड्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्टक्चर प्रा.लि.
मे. आर.के. मधानी अ‍ॅण्ड कंपनी
मे. जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स
मे. के. आर. कन्स्ट्रक्शन
मे. सुप्रीम इन्फ्रास्टक्चर इंडिया लि.
मे. प्रकाश इंजिनीअर्स अ‍ॅण्ड इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि.
मे. न्यू इंडिया रोडवेज
मे. प्रीती कन्स्ट्रक्शन
मे. वित्राग कन्स्ट्रक्शन
पालिका निवडणुकीनंतर कारवाईला पुन्हा वेग : मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजल्याने चौकशीची दुसरी फेरी थंडावली. या चौकशीचा अहवाल आयुक्तांकडे सादर झाला तरी अद्याप उघड झालेला नाही. मात्र या अहवालानुसार आता प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. दुसऱ्या टप्प्यात दोनशे रस्त्यांची पाहणी पालिकेने केली होती. यामध्ये या रस्त्यांचा पायाच कमकुवत असल्याचे उजेडात आले. त्यानुसार या ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला आहे.

Web Title: Notice to ten contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.