व्हीसीएची ‘टाइम्स आॅफ इंडिया’ला नोटीस
By Admin | Published: January 15, 2016 02:11 AM2016-01-15T02:11:33+5:302016-01-15T02:11:33+5:30
बदनामीकारक आणि तथ्यहीन वृत्त प्रकाशित केल्याप्रकरणी विदर्भ क्रिकेट असोसिएशनने (व्हीसीए) टाइम्स आॅफ इंडियाला मानहानीची नोटीस बजावली आहे. या वृत्तपत्राचे
नागपूर : बदनामीकारक आणि तथ्यहीन वृत्त प्रकाशित केल्याप्रकरणी विदर्भ क्रिकेट असोसिएशनने (व्हीसीए) टाइम्स आॅफ इंडियाला मानहानीची नोटीस बजावली आहे. या वृत्तपत्राचे व्यवस्थापन, तसेच एडिटोरियल बोर्डाला उद्देशून पाठविलेल्या नोटीसमध्ये तीन दिवसांत विनाशर्त लेखी माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईसाठी तयार राहा, असा इशारा देण्यात आला आहे.
जामठा येथील व्हीसीए स्टेडियमच्या बांधकामाला मंजुरी नसल्याचे वृत्त टीओआयने ६ जानेवारी रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताचा आधार म्हणून माहितीच्या अधिकारात बाहेर आलेली कागदपत्रे पुढे करण्यात आली होती. व्हीसीए व्यवस्थापनाने या वृत्ताची गंभीर दखल घेत टीओआयच्या प्रतिनिधींना व्हीसीए परिसरात येण्यास बंदी घातली. स्टेडियम परिसरात प्रवेश करण्यास, तसेच क्रिकेट सामन्यांना हजर राहण्यासही मनाई करण्यात आल्याने हा वाद चिघळला. व्हीसीएची प्रतिमा मलीन करण्यासाठी हेतुपुरस्सरपणे हे वृत्त प्रकाशित करण्यात आल्याचा व्हीसीएचा वृत्तपत्रावर आरोप आहे.