आयुक्त तुकाराम मुंढेच्या अडचणींत वाढ; महिला आयोगाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 10:38 PM2020-07-06T22:38:58+5:302020-07-06T22:40:42+5:30
तकारीची दखल घेत सात दिवसात स्पष्टीकरण मागितले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमानुसार महिला कर्मचाºयांना प्रसूती कालावधीत मिळणाºया लाभापासून वंचित ठेवले. उद्भवलेल्या कोविड-१९ च्या महामारी कालावधीत वर्क फ्रॉम होमची अनुमती नाकारून त्यांनी माझा मानसिक छळ केला, अशा आशयाची तक्रार स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या कंपनी सेक्रेटरी यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली आहे. या तक्रारीची दखल घेत महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष रेखा शर्मा यांनी आयुक्तांना नोटीस बजावली असून, यावर सात दिवसात स्पष्टीकरण मागितले आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे मला स्मार्ट सिटी कर्मचाºयांच्या समोर अपमानास्पद वागणूक देतात. त्यांना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मान्य करण्यासाठी माझ्यावर दबाव आणत आहेत. उद्भवलेल्या कोविड-१९ च्या महामारीच्या उद्रेकामुळे नागपूर पासून १०० किमी अंतरावर माझ्या जन्मगावी तीन महिन्याचे बाळ सोडून मी आली आहे. मला वर्क फ्रॉम होमची अनुमती त्यांनी नाकारली, माझा मानसिक छळ केला, अशी तक्रार संबंधित महिला कंपनी सेक्रेटरीने महिला आयोगाकडे केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
अन्य महत्वाच्या बातम्या...
देशाच्या राजकारणात लवकरच खळबळ; शरद पवारांच्या मातोश्रीभेटीनंतर राऊतांची मोठी घोषणा
ठाकरे सरकारला दणका! अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचं शिक्षण विभागाला पत्र
गुड न्यूज! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संखेत मोठी घट
टाटा पुन्हा मदतीला धावले! मुंबई मनपाला १० कोटी, १०० व्हेंटीलेटर्स, २० रुग्णवाहिका
ठरलं! 8 जुलैपासून हॉटेल्स - लॉज उघडणार, पण...; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा
एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले
गृहमंत्र्यांनी पोलीस बदल्यांची मुख्यमंत्र्यांना कल्पनाच दिली नसेल; देवेंद्र फडणवीसांना वेगळीच शंका
लढाईला तयार रहा! PUBG चा नवा मॅप येड लावणार; उद्या मोठी अपडेट मिळणार