घातक कचरा निर्माण करणाऱ्या ५ हजार ८७२ उद्योगांना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 01:15 AM2018-09-20T01:15:18+5:302018-09-20T01:15:37+5:30
प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई; उद्योग जगतात खळबळ
- राजेश मडावी
चंद्रपूर : घातक कचरा निर्माण करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावणाºया राज्यातील ५ हजार ८७२ उद्योगांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीसा बजावल्या आहेत. या घटनेने उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीनुसार राज्यातील ५ हजार ८७२ उद्योग घातक कचरा निर्माण करीत असल्याचे दिसून आले. या उद्योगांनी उत्पादनासोबतच सामायिक सांडपाणी प्रक्रिया, कचरा प्रक्रिया, साठवण व विल्हेवाट संयंत्रणा बसविली नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने मागील आठवड्यात या उद्योगांना कारवाईच्या नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पुणे प्रादेशिक विभागातील १ हजार १३४ उद्योगांचा समावेश आहे. दुसरा क्रमांक कल्याण विभागाचा लागतो. या कंपन्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नाही तर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
घातक कचरा निर्माण करणारे उद्योग
विभाग उद्योग संख्या
अमरावती ७२
औरंगाबाद ३२४
चंद्रपूर १३१
कल्याण ८७६
कोल्हापूर ३५७
मुंबई ३८०
नागपूर ३४०
विभाग उद्योग संख्या
नाशिक ४७९
नवी मुंबई ६९०
पूणे ११३४
ठाणे ७४१
रायगड ३४८
एकूण ५८७२