बँकांमधून मिळणार शंभराच्या नोटा

By Admin | Published: November 16, 2016 05:12 AM2016-11-16T05:12:00+5:302016-11-16T05:08:59+5:30

बँकांमधून आता एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटांच्या बदल्यात आता शंभर वा पन्नास रुपयांच्या नोटा देखील मिळतील. वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार

Notices of hundredths to be received from banks | बँकांमधून मिळणार शंभराच्या नोटा

बँकांमधून मिळणार शंभराच्या नोटा

googlenewsNext

मुंबई : बँकांमधून आता एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटांच्या बदल्यात आता शंभर वा पन्नास रुपयांच्या नोटा देखील मिळतील. वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात हा निर्णय घेण्यात आला.
मुनगंटीवार यांनी लोकमतला सांगितले की, राज्यातील ग्रामीण भागात तसेच शहरांमधील झोपडपट्टयांमध्ये हजार, पाचशे रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी तत्काळ मोबाइल करन्सी चेंजर व्हॅन तैनात करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. अपना बाजार, सहकार भांडार आणि दूध विक्री केंद्रांवर एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. बँकांमध्ये येणाऱ्या सर्वच ग्राहकांसाठी बिस्किट आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)


बँकांकडून घेणार तपशील-
नोटाबंदीनंतर काही बँकांमध्ये एकाच व्यक्तीला मोठ्या प्रमाणात नोटा बदलून देण्यात आल्याच्या काही तक्रारी आहेत. त्यात प्राथमिकदृष्ट्या तथ्य आढळलेले नाही. तरीही या संदर्भात बँकांकडून माहिती घेतली जाईल, असे मुनगंटीवार म्हणाले.
गडचिरोलीत हेलिकॉप्टरगडचिरोलीच्या दुर्गम भागात बँकांना पैसे पोहोचविण्यासाठी प्रसंगी हेलिकॉप्टरची सुविधा पुरविली जाईल, असे रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. मायक्रो एटीएम खासगी इस्पितळांमध्ये मायक्रो एटीएम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी एक बँकमित्रही तैनात असेल. तो रुग्णांच्या नातेवाइकांना सहकार्य करेल आणि पैसे उपलब्ध करून देईल.

Web Title: Notices of hundredths to be received from banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.