अल्पसंख्याक संस्थांना नोटिसा
By admin | Published: June 12, 2015 04:25 AM2015-06-12T04:25:14+5:302015-06-12T04:25:14+5:30
तीन वर्षांत एकाही अल्पसंख्याक विद्यार्थ्याला प्रवेश न देणाऱ्या दक्षिण मुंबईतील १० शैक्षणिक संस्थांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करण्याबाबत
मुंबई : तीन वर्षांत एकाही अल्पसंख्याक विद्यार्थ्याला प्रवेश न देणाऱ्या दक्षिण मुंबईतील १० शैक्षणिक संस्थांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
विनाअनुदानित अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांना प्रवेश देताना मंजूर क्षमतेच्या ५१ टक्क्यांपेक्षा कमी नसतील इतक्या जागा ती संस्था ज्या अल्पसंख्याक समाजाची असेल त्याच अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांमधून भरणे आवश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कारवाई होणार असल्याचे खडसे म्हणाले. शिल्लक जागा संस्थांनी संबंधित शिक्षण विभागास हस्तांतरित करायच्या व त्या गुणवत्तेनुसार भरायच्या आहेत. राज्यात अल्पसंख्याक दर्जा असलेल्या २४९० संस्था आहेत.