नाशकात स्लीपांसोबत नोटा; ३५ हजाराची रोकड जप्त

By admin | Published: February 20, 2017 01:38 PM2017-02-20T13:38:51+5:302017-02-20T14:09:53+5:30

नाशिकमध्ये एका राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मतदार स्लीपांसोबत घरोघरी नोटांचा पुरवठा केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे.

Notices with Sleep in Nashik; 35 thousand cash seized | नाशकात स्लीपांसोबत नोटा; ३५ हजाराची रोकड जप्त

नाशकात स्लीपांसोबत नोटा; ३५ हजाराची रोकड जप्त

Next


नाशिक आॅनलाईन लोकमत :
नाशिकमध्ये एका राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मतदार स्लीपांसोबत घरोघरी नोटांचा पुरवठा केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. वडाळागावातील प्रभाग क्रमांक ३० मधील गणेशनगर भागात हा प्रकार घडला असून येथील काही पुरस्कृत उमेदवारांच्या पॅनलकडून नागरिकांना घरोघरी कार्यकर्ते जाऊन स्लीपांसोबत नोटा देत होते. सदर बाब दुसऱ्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर कार्यकर्त्यांना रंगे हाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्यांच्याकडून ३५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Web Title: Notices with Sleep in Nashik; 35 thousand cash seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.