सेलिब्रिटीजना स्वस्तात भूखंड देणारी १९८३ची अधिसूचना रद्द होणार
By admin | Published: February 5, 2016 03:32 PM2016-02-05T15:32:10+5:302016-02-05T15:32:10+5:30
सेलिब्रिटिजना स्वस्तात भूखंड देणारा १९८३ ची अधिसूचना महाराष्ट्र सरकार रद्द करणार असल्याचे वृत्त असून याचा फटका हेमामलिनी यांना बसेल अशी चिन्हे आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - सेलिब्रिटिजना स्वस्तात भूखंड देणारा १९८३ ची अधिसूचना महाराष्ट्र सरकार रद्द करणार असल्याचे वृत्त असून याचा फटका हेमामलिनी यांना बसेल अशी चिन्हे आहेत. हेमामालिनी यांच्या नृत्यप्रशिक्षण संस्थेला अवघ्या ९० हजारांमध्ये मुंबईत आंबिवली, अंधेरी येथे भूखंड देण्याचे जाहीर झाल्यावर टीकेची झोड उठली होती. तर याबाबत बोलताना हेमामालिनी यांनी २० वर्षांपूर्वीची प्रलंबित मागणी आत्ता मंजूर झाल्याचे सांगितले होते.
शुक्रवारी महाराष्ट्र सरकारने जनमताची दखल घेत ही अधिसूचना रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सूत्रांच्या सांगण्यानुसार यांसदर्भात नवीन कायदा बनवण्यात येत आहे. अर्थात, हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार नाही. त्यामुळे ज्यांना भूखंडाचे हस्तांतरण झाले आहे, त्यांना झळ बसणार नाही. परंतु ज्यांना भूखंडाते हस्तांतरण झालेले नाही, त्यांना नवीन कायद्याप्रमाणे जास्त किंमत भरून भूखंड मिळेल.
त्यामुळे हेमामलिनी यांनाही सदर भूखंड ९० हजारांमध्ये न मिळता, रेडीरेकनरच्या दराने घ्यावा लागण्याची शक्यता आहे.