राज्यात आता होणार १५ सायबर लॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2016 05:23 AM2016-08-08T05:23:21+5:302016-08-08T05:23:21+5:30
आॅनलाइन गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सायबर लॅब निर्मितीची प्रक्रिया राज्यात वेगात सुरू आहे. नागपूरसह ठिकठिकाणच्या १५ सायबर लॅबचे काम अंतिम
नरेश डोंगरे, नागपूर
आॅनलाइन गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सायबर लॅब निर्मितीची प्रक्रिया राज्यात वेगात सुरू आहे. नागपूरसह ठिकठिकाणच्या १५ सायबर लॅबचे काम अंतिम टप्प्यात असून, या स्वातंत्र्यदिनी, १५ आॅगस्टला त्या कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे आता पोलिसांना ‘फॉरेन्सिक लॅब’च्या अहवालांवर महिनोंमहिने अवलंबून राहावे लागणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पोलीस दल स्मार्ट बनविण्याची योजना जाहीर केली होती. त्या योजनेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या ‘सायबर लॅब’ची निर्मिती प्रत्येक जिल्हा पोलीस मुख्यालयी करण्यात येणार आहे. नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ‘सायबर लॅब’चे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या १५ आॅगस्टला
राज्यातील १५ लॅबचे उद्घाटन करण्यात येणार आहे.