नालेसफाईनंतर आता लक्ष रस्ते पाहणीकडे

By admin | Published: May 18, 2015 04:32 AM2015-05-18T04:32:53+5:302015-05-18T04:32:53+5:30

ऐन पावसाळ्यात नाले तुंबण्यासह रस्ते उखडून मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून महापालिकेने आता नालेसफाईसह येथील रस्त्यांच्या पाहणीवरही

Now after the Nalsafai, the road to the road survey | नालेसफाईनंतर आता लक्ष रस्ते पाहणीकडे

नालेसफाईनंतर आता लक्ष रस्ते पाहणीकडे

Next

मुंबई : ऐन पावसाळ्यात नाले तुंबण्यासह रस्ते उखडून मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून महापालिकेने आता नालेसफाईसह येथील रस्त्यांच्या पाहणीवरही जोर दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह आयुक्त अजय मेहता यांनीही नालेसफाईच्या कामासह रस्ते पाहणीचा धडका लावला आहे.
पावसाळ्यात नाले तुंबून परिसर जलमय होऊ नये म्हणून महापालिकेच्यावतीने मे महिन्यातच नालेसफाईचे काम हाती घेतले जाते. पावसाळ्यापूर्वी ६० टक्के, पावसाळ्यात २० टक्के आणि उर्वरित काळात २० टक्के अशा पद्धतीने नालेसफाचे काम केले जाते. आतापर्यंत नालेसफाईचे काम ६० टक्के झाल्याचा दावा पालिकेने केला असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली आहे. शिवाय आयुक्तांनी त्यानंतरही पश्चिम उपनगरातील नाल्यांसह रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. आणि आता १८ मे (सोमवार) महापौर स्नेहल आंबेकर शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या कामांची पाहणी करणार आहेत. महापौरांचा पाहणी दौरा ठक्कर कॅटर्स, बिर्ला क्रीडा केंद्र, गिरगाव चौपाटी येथून सोमवारी रात्री ८ वाजता सुरु होणार आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Now after the Nalsafai, the road to the road survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.