आता केळव्यात होणार विमाननिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2016 05:34 AM2016-08-27T05:34:08+5:302016-08-27T05:34:08+5:30

भारतीय बनावटीचे सहाआसनी विमान बनवण्याचे कांदिवली येथील कॅप्टन अमोल यादव या वैमानिकाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.

Now the aircraft will be in the airplane | आता केळव्यात होणार विमाननिर्मिती

आता केळव्यात होणार विमाननिर्मिती

googlenewsNext

हितेन नाईक/निखिल मेस्त्री,

पालघर- भारतीय बनावटीचे सहाआसनी विमान बनवण्याचे कांदिवली येथील कॅप्टन अमोल यादव या वैमानिकाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. शासनाने केळवे (पूर्व) येथील किल्लेदार डेअरीची जागा त्याला विमाननिर्मितीसाठी देण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
अमोल यादव याने आपले शिक्षण मुंबईतून पूर्ण करून वैमानिकाचे प्रशिक्षण घेतले. पुढे प्रगत वैमानिकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्याने अमेरिका गाठली. तिथे प्रशिक्षण घेत असताना विमाननिर्मितीचे धडेही त्याला मिळाले. आपण स्वत:ही विमानाची निर्मिती करू शकतो, असा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण झाला आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याचा दिशेने त्याची धडपडणारी वाटचाल सुरू झाली.
विमानाचा एकेक भाग जमवता जमवता त्याची खूप दमछाक होऊ लागली. तरीही, त्याने पाहिलेले स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. तब्बल सहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर जेट एअरवेजमध्ये वैमानिक असलेल्या अमोलने कांदिवली येथील आपल्या सुकांत सोसायटीच्या छतावर ळअउ-003 या सहाआसनी विमानाची निर्मिती केली. त्यानंतर केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून (डीजीसीए) या सहाआसनी प्रवासी विमानाला मान्यता घेण्यासाठी अमोलला खूप अडचणींचा सामना करावा लागला. परंतु, तिथेही त्याने हार न मानता मेक इन इंडियाअंतर्गत मुंबईत आयोजित केलेल्या ‘मेक इन महाराष्ट्र’ कार्यक्रमात स्वत: तयार केलेले विमान ठेवले होते आणि उपस्थित देशी आणि परदेशी उद्योजकांचे त्याकडे लक्ष वेधून घेतले होते.
>लहान शहरे जोडली जातील
भविष्यात उभे राहणारे हे १५ ते २० आसनी विमान देशांतर्गत दळणवळणासाठी फायदेशीर ठरणार असून याचा प्रवास सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असेल. छोटेखानी विमान असल्यामुळे त्याद्वारे लहान शहरे जोडली जातील.
- कॅ. अमोल यादव
>स्थगिती आदेशाचा अडसर
राज्य शासनाच्या मुख्य सचिवांमार्फत मे २०१६मध्ये ६ किंवा २० आसनी विमाननिर्मितीच्या कारखाना उभारणीसाठी २०० एकर जागेचा प्रस्ताव पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला होता. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्याने केळवे रोड येथे पूर्वेला १६० एकर जागा असल्याबद्दल कळवल्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी त्या जागेची घोषणा केली. परंतु, त्याजागेसंदर्भात उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्याने अमोल यादवच्या विमान उड्डाणाच्या केळवे येथील कारखाना उभारण्याच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण होऊ शकतो.
>पंतप्रधानांकडून दखल
त्याच्या या नावीन्यपूर्ण कामगिरीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुद्धा घ्यावी लागली. फक्त सहाआसनी विमानाच्या निर्मितीपर्यंत आपले ध्येय न ठेवता पुढे अधिक प्रवासी आसन क्षमतेचे विमान बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची त्यांनी त्याला स्फूर्ती दिली. शासनपातळीवरून पूर्ण सहकार्य देण्याचे वचनसुद्धा दिले होते. त्यानुसार, अमोल यादव याच्या विमाननिर्मितीच्या प्रकल्पाला शासनाने केळवे रोड (पूर्व) येथील जागा देण्याचे जाहीर केले.

Web Title: Now the aircraft will be in the airplane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.