अंधांना आता ‘व्हॉट्सअॅप’चा आधार
By admin | Published: September 17, 2015 01:47 AM2015-09-17T01:47:34+5:302015-09-17T01:47:34+5:30
‘ब्रेल लिपी’ने लिहायला, वाचायला शिकविले तर अॅप्लिकेशनच्या मायाजालात तंत्रज्ञानाने अंध बांधवांना एकमेकांशी जोडले आहे. ‘टॉक बॅक’सह कित्येक अॅप्लिकेशनमुळे
- सतीश डोंगरे, नाशिक
‘ब्रेल लिपी’ने लिहायला, वाचायला शिकविले तर अॅप्लिकेशनच्या मायाजालात तंत्रज्ञानाने अंध बांधवांना एकमेकांशी जोडले आहे. ‘टॉक बॅक’सह कित्येक अॅप्लिकेशनमुळे अंधबांधव आज सातासमुद्रापार आपल्या मित्रांशी व्हॉट्स अॅपवर चॅटिंगद्वारे सुख-दु:खाच्या गोष्टी शेअर करीत आहेत.
काहींनी खास ग्रुपही तयार केले आहेत. ‘अॅड्रॉईड वर्ल्ड, अॅड्रॉईड अॅक्सेब्लिटी हिंदी, टॉकबॅक युजर, म्युझिकल लव्हर्स, जनरल नॉलेज, व्हिजन, गुलदस्ता, ऊर्दू वजा’ यांसारख्या असंख्य ग्रुपवर जगभरातील अंधबांधव जोडलेले आहेत. अमेरिकेसह पाकिस्तान, कझाकिस्तानमधील मित्रांशी ही मंडळी संपर्क साधतात, असे प्रा. विकास शेजवळ यांनी सांगितले.
स्मार्टफोनमुळे आमचे जीवन सुकर झाले आहे. पूर्वी वृत्तपत्र वाचायला किंवा मित्रांशी संपर्क साधण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागत होती. आता स्मार्टफोनमुळे आम्ही स्वावलंबी झालो आहोत. आॅनलाइन वृत्तपत्र वाचण्याबरोबर मित्रांशी संपर्क साधणेही सोयीस्कर झाले आहे. त्यातच व्हॉट्स अॅपमुळे विदेशातील मित्रांशी हितगुज करता येते. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील सात ते आठ हजार अंध बांधव केवळ स्मार्टफोनमुळे संपर्कात असून, त्यांना टेक्नोसॅव्ही करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे शेजवळ यांनी सांगितले.
रक्तदानासाठी सरसावले शेकडो हात
मुंबईतील अंधेरी येथील रहिवासी आॅगस्टीन चेटिआर यांच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना रक्ताची नितांत गरज होती. आॅगस्टीन यांनी ब्लड बँकांमध्ये तातडीने संपर्कही साधला, मात्र वेळेत सगळ्या गोेष्टी जुळत नसल्याने त्यांनी मदतीसाठी व्हॉट्स अॅपवर मॅसेज फॉरवर्ड केला. त्यानंतर काही मिनिटांतच शेकडो अंध बांधव रक्तदानासाठी पुढे आले. काहींनी तर थेट रुग्णालयात धाव घेतली. आॅगस्टीन यांनी ग्रुपमधील सर्व सदस्यांचे आवर्जून आभार मानले.
- ‘गुगल टीपीएस, लेखा’ या दोन अॅप्समुळे हिंदी, मराठी भाषांतील मेसेज वाचणे शक्य होते. त्याशिवाय देशातील अन्य ३४ भाषांमधील मॅसेज मराठी, हिंदी भाषेत वाचता येतात.
- संवाद साधण्यासाठी व्हॉईस
क्लीपचा पुरेपूर वापर केला जातो.
- टॉकिंग सॉफ्टवेअरची सर्वाधिक मदत
पेपर वाचणे किंवा इतरांशी संपर्क साधण्यासाठी आम्हाला इतरांवर अवलंबून रहावे लागत असे. आता आम्ही स्वावलंबी झालो आहोत.
- खंडू भंडारे