रक्तही महागणार! ₹१०० एवढी बाटलीमागे दरवाढ; राज्य सरकारला प्रस्ताव सादर
By संतोष आंधळे | Published: July 19, 2022 05:24 AM2022-07-19T05:24:46+5:302022-07-19T05:25:48+5:30
स्वयंपाकाच्या गॅसपासून अन्नधान्य महाग झाले असताना आता रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी लागणारे रक्तही बाटलीमागे १०० रुपयांनी महागणार आहे.
संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्वयंपाकाच्या गॅसपासून अन्नधान्य महाग झाले असताना आता रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी लागणारे रक्तही बाटलीमागे १०० रुपयांनी महागणार आहे. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने रक्ताची दरवाढ करण्याचे पत्रक नुकतेच राज्य रक्त संक्रमण परिषदेला पाठविले होते. त्यानंतर राज्य परिषदेने दरवाढीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे.
२०१४ नंतर प्रथमच दरवाढ होत आहे. रक्त आणि रक्त घटक (रेड सेल) यांच्याच किमतीत १०० रुपयाने वाढ होणार आहे. प्लाझ्मा, प्लेट लेट्स आणि क्रायो यांच्या किमतीत वाढ होणार नाही.
खासगी रक्तपेढ्यांमधील एका बाटलीची किंमत
₹१,४५० सध्या, ₹१,५५० नंतर
रक्ताची गरज
३६३ रक्तपेढ्या राज्यात, ७६ रक्तपेढ्या सरकार व महापालिकेच्या, २८७ रक्तपेढ्या धर्मादाय आणि खासगी संस्थेच्या
किती बाटल्या संकलन?
१६.७३ लाख । २०२१, ८.३४ लाख । २०२२*
किती लागते रक्त?
लोकसंख्येच्या तुलनेत १% रक्त संकलित केले पाहिजे. राज्याने गेली काही वर्षे त्याच्यापेक्षा अधिक रक्त संकलित केले आहे.