विद्यापीठाची माहिती आता एका क्लीकवर

By admin | Published: June 25, 2014 06:56 PM2014-06-25T18:56:58+5:302014-06-25T19:01:11+5:30

विद्यापीठाची संपूर्ण माहिती विद्यापीठात येणार्‍या व्यक्तीला एका क्लिकवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विद्यापीठात लवकरच 'इन्फॉर्मेशन केआयओएसके' यंत्र बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Now a click here for university information | विद्यापीठाची माहिती आता एका क्लीकवर

विद्यापीठाची माहिती आता एका क्लीकवर

Next

जळगाव : विद्यापीठाची संपूर्ण माहिती विद्यापीठात येणार्‍या व्यक्तीला एका क्लिकवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विद्यापीठात लवकरच 'इन्फॉर्मेशन केआयओएसके' यंत्र बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मंगळवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. या यंत्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या विविध प्रकारची माहिती, पत्रके उपलब्ध होऊ शकणार आहेत. प्रशासकीय इमारत, ग्रंथालय, अतिथीगृह, धुळे, नंदुरबार व अमळनेर या उपकेंद्रावर ही यंत्र बसविण्यात येणार आहेत. 
समिती गठीत 
विद्यापीठात दीर्घ काळापासून कार्यरत असलेल्या ५६ कुशल, अर्धकुशल व वेतनिक म्हणून काम करणार्‍या कर्मचार्‍यांना विद्यापीठाच्या सेवेत एकत्रित वेतनावर कशा पद्धतीने सामावून घेता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. अरविंद चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. नागपूर, नांदेड व अमरावती येथील विद्यापीठांना ही समिती भेट देऊन अभ्यास करून तीन महिन्यात अहवाल देणार आहे. 
सामंजस्य कराराला सहमती 
विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस आणि जी. के. स्क्रायबीन इन्स्टिट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री अँण्ड फिजिओलॉजी ऑफ मायक्रो ऑर्गेनिझम रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस करस्पॉंडिंग मेंबर ऑफ रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, मास्को यांच्या समवेत सामंजस्य कराराला यावेळी सहमती देण्यात आली. 
क्रीडा मंडळावर नियुक्ती 
विद्यापीठाच्या क्रीडा मंडळावर प्रा. के. पी. पाठक (बोदवड), प्रा. आर. एस. पगारे (धुळे), प्रा. दीपक पाटील (धरणगाव), प्रा. ए. आर. कांबळे (शहादा) यांचे तर आमंत्रित सदस्य म्हणून प्रा. क्रांती वाघ (चोपडा) यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. सूत्रसंचालन कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन यांनी केले. 

जर्मन भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम 
विद्यापीठातील भाषा अध्ययन व संशोधन प्रशाळेत तीन महिन्याचा जर्मन  भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. विद्यापीठात जर्मन  भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मागणी होती. या शैक्षणिक वर्षापासून हा तीन महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. याबरोबरच ई-सुविधा योजनेंतर्गत या वर्षापासून एम. फार्म, एम. टेक. (पर्यावरण), एम. ई. बी.एसस्सी (अँक्च्युरियल सायन्स) या अभ्यासक्रमांचा समावेश करण्याचाही प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. 

 

Web Title: Now a click here for university information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.