जनजागृतीसाठी आता सायकलस्वारांची ‘वाशिम ते काश्मीर’ वारी!

By admin | Published: May 20, 2017 08:32 AM2017-05-20T08:32:45+5:302017-05-20T08:32:45+5:30

भ्रष्टाचारमुक्त भारत, वाहतुक नियमाबाबत जनजागृती संदेश देण्याकरीता ‘वाशिम टु काश्मिर’ वारी काढली. १५ दिवसात हा गृप काश्मिर येथे पोहचणार आहे.

Now the cyclists 'Washim to Kashmir' war for public awareness! | जनजागृतीसाठी आता सायकलस्वारांची ‘वाशिम ते काश्मीर’ वारी!

जनजागृतीसाठी आता सायकलस्वारांची ‘वाशिम ते काश्मीर’ वारी!

Next

ऑनलाइऩ लोकमत 
वाशिम, दि. 20 -  शहरातील युवा समाजसेवी युवकांनी एकत्रित येवून सायकलस्वार ग्रुपच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती, बेटी बचाव, आरोग्य जनजागृती, प्लॉस्टीक निर्मूलन, जलसंरक्षण, वृक्षारोपण व संवर्धन, जलपुर्नभरण, भ्रष्टाचारमुक्त भारत, वाहतुक नियमाबाबत जनजागृती संदेश देण्याकरीता ‘वाशिम टु काश्मिर’ वारी काढली. १५ दिवसात हा गृप काश्मिर येथे पोहचणार आहे. यापूर्वीही वाशिम ते कन्याकुमारीसह विविध ठिकाणी भेटी देवून त्यांनी जनजागृती केली. वाशिम येथून १४ मे रोजी काश्मिरसाठी हा गृप रवाना झाला आहे.
या प्रवासादरम्यान ठिकठिकाणी विविध सामाजीक विषयावर जनजागृती करण्यात येईल. आपल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबाबत सायकलस्वार ग्रुपच्या सदस्यांनी सांगीतले की, आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा सायकल चालविणे हा रामबाण उपाय आहे. 
सायकल चालविण्यामुळे शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम होवून शरीर सुदृढ राहते. मन शांत व एकाग्रचित्त राहते. दिवसभर उर्जेचा संचार शरीरात राहते. अनेक रोगांपासून मुक्तता मिळते. तसेच सायकल चालविल्याने पेट्रोल व डिझेलची बचत होवून प्रदुषणापासून मुक्ती मिळून पर्यावरणाची होणारी हानी थांबते व राष्ट्रीय कार्यात सहभाग मिळते. प्रत्येकाने सायकलचा उपयोग करुन आठवड्यातुन एकदा तरी दिवसभर सायकलनेच प्रवास करण्याचे आवाहनही या ग्रुपने केले आहे. या वारीमध्ये एकूण १५ जण सहभागी आहेत. यामध्ये श्रीनिवास व्यास, मनिष मंत्री, आदेश कहाते, कृष्णकांत इंगोले, हरक पटेल, यश शिंदे, गजानन इंगोले, रेखा रावले, सागर रावले, सुधाकर संगवर, दीपक एकाडे, आशिष शर्मा, श्रीरंग गुजरे, नीरज चोरले, सुरज शर्मा या १५ सायकलपटूंनी सहभाग आहे.

फ्रान्सच्या धर्तीवर आधारित ‘ब्रेवेट’सायकलींग स्पर्धेत वाशिम आंतरराष्ट्रीय स्तरावर

फ्रान्सच्या धरतीवर आधारित ‘ब्रेवेट’ सायकलिंग स्पर्धेमध्ये नोव्हेबर ते नोव्हेबर या एका वर्षात १२ तासात ठरलेल्या कि.मि.नुसार प्रवास करणाऱ्या सायकल पटूला ‘सुपर रॉदिनर’ हा बहुमान दिल्या जातो. हा बहुमान वाशिमच्या नारायणाने मिळविला आहे. ‘सुपर रॉदिनर’ हा सायाकिंगच्या जगातील बहुमान प्राप्त करणारा वाशीम जिल्ह्यातील पहिला सायकल पटू नारायण व्यास ठरला आहे. फ्रान्सच्या धरतीवर आधारित ‘ब्रेवेट’ सायकलिंग स्पर्धेमध्ये नोव्हेबर ते नोव्हेबर या एका वर्षात १२ तासात २०० कि.मी, २० तासात ३०० कि.मी., २७ तासात ४०० कि.मी. व ४० तासात ६०० कि.मी. सायकल ने पूर्ण करण्याऱ्या सायकल पटूला ‘सुपर रॉदिनर’ हा बहुमान दिल्या जातो. मागील एका वर्षात वाशीमच्या सायकल स्वार ग्रुप ने या स्पर्धेत भाग घेऊन वाशीमचे नाव आंतराष्ट्रीय स्तरावर नेले आहे. तसेच या सायकल गृपमधील सायकलपटू नारायण व्यास, महेश धोंगडे तसेच माजी तहसीलदार आशिष बिजवल यांनी ‘ब्रेवेट’ सायकल स्पर्धेत नागपूरमध्ये वाशिमचे नाव चमकाविले आहे.

आपले आरोग्य सृदूढ रहावे याकरिता काही मित्रांनी मिळून एक सायकलस्वार गृप तयार केला. दर रविवारी सायकलने फिरता फिरता वाढत्या प्रदूषणाबाबत व सायकलच्या प्रचार, प्रसाराकरिता जनजागृती व्हावी या दृष्टीकोनातून वाशिम ते कन्याकुमारी जनजागरण यात्रा काढण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेसह विविध विषयांवर जनजागृती केली. नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता आज प्रत्येक सायकल स्पर्धेसह जनजागृतीसाठी गृप सक्रीय आहे.
- श्रीनिवास व्यास, सायकलस्वार गृप सदस्य, वाशिम

Web Title: Now the cyclists 'Washim to Kashmir' war for public awareness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.