मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी आता जिल्हास्तरीय समिती

By Admin | Published: August 18, 2016 07:53 PM2016-08-18T19:53:25+5:302016-08-18T19:53:25+5:30

शहरातील रस्ता व गल्ली बोळात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना आवरण्यासाठी त्यांच्या जन्मावर बंधन घालण्यात येणार आहे.

Now the district level committee will be able to prevent the growing number of dogs | मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी आता जिल्हास्तरीय समिती

मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी आता जिल्हास्तरीय समिती

googlenewsNext

मोकाट कुत्र्यांना आवरणार

नीलेश शहाकार
बुलडाणा, दि. 18 : शहरातील रस्ता व गल्ली बोळात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना आवरण्यासाठी त्यांच्या जन्मावर बंधन घालण्यात येणार आहे. त्यासाठी अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल(डॉग्ज) रूल्स नुसार राज्यस्तरीय तसेच प्रत्येक जिल्ह्यात देखरेख समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. राज्यशासनाच्या नगर विकास विभागाने १६ आॅगस्ट रोजी घेतला.
अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडिया विरूध्द पीपल फॉर इलिमेशन आॅफ ट्राय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाकडून शासनला आदेश देण्यात आले आहे. न्यायालयाने कुत्र्यांची वाढती संख्या, रेबीज निर्मूलन व मनुष्य-कुत्रा संघर्ष टाळण्यासाठी राज्य व जिल्हा पातळीवर देखरेख ठेवण्याकरिता समित्या स्थापन करा, असे आदेशात नमूद आहे.

नगरविकास विभागाचे सचिव या समितीचे अध्यक्ष असून नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक या समितीचे सदस्य सचिव आहेत. तर या समितीमध्ये पशुसंवर्धन, सार्वजनिक आरोग्य, ग्राम विकासचे प्रधान सचिव, अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाचे प्रतिनिधी, राज्य अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाचे प्रतिनिधी, पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक आदी दहा सदस्य आहेत. या समितीची बैठक ३ महिन्यातून एकदा घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

असे राहतील समित्यांचे कार्य
स्थानिक पातळीवर प्राणी जन्म नियंत्रण समित्या, स्थापन करणे. व्यापक जिल्हानिहाय योजना विकसित करणे, स्थानिक/ जिल्हानिहाय योजना राबविण्याकरिता संस्थांची निवड करणे. जेथे उपरोक्त संस्था उपलब्ध नाही तेथे पशुसंवर्धन विभागाने विशेष वाहन उपलब्ध करणे. प्राण्यांच्या नसबंदीकरिता दर ठरविणे, त्यात दरवर्षी सुधारणा करणे.

कुत्र्यांच्या उपद्रवामुळे त्रास
राज्यभर मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त आहेत. राज्य पशुसंवर्धन आयुक्त व आरोग्य विभागाच्या यांच्या संयुक्त अहवालानुसार गत पाच वर्षात राज्यात ४५ हजार १७५ लोकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे. तर २०१६ मध्ये जानेवारी ते जुलै या सात महिण्यात ५ हजार ६३ लोकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला.

 

Web Title: Now the district level committee will be able to prevent the growing number of dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.