आता विभागनिहाय स्वतंत्र वीज कंपनी!
By admin | Published: April 21, 2015 01:28 AM2015-04-21T01:28:52+5:302015-04-21T01:28:52+5:30
प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी वैधानिक विकास मंडळांच्या धर्तीवर राज्यात आता विभागनिहाय स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करण्याचे राज्य सरकारच्या
कमल शर्मा, नागपूर
प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी वैधानिक विकास मंडळांच्या धर्तीवर राज्यात आता विभागनिहाय स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे समजते़ याला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुजोरा दिला. मध्य प्रदेश व गुजरातमध्ये अशा प्रकारच्या स्वतंत्र वीज कंपन्या कार्यरत आहेत़
मुंबईवगळता राज्याच्या इतर भागात महावितरणचा एकाधिकार आहे. परिणामी प्रादेशिक असमतोल निर्माण होत असल्याचा आरोप केला जात होता़ हा असमतोल दूर करून प्रत्येक विभागाला न्याय देण्यासाठी भाजपा सरकारने विभागनिहाय स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करण्याचा विचार सुरू केला आहे़ यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वितरण कंपनी असेल. सर्व कंपन्यांचे स्वतंत्र प्रबंध संचालक राहतील़ सूत्रांनी सांगितले की, फडणवीस सरकारने यासंबंधात पुढाकार घेतला असून, याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यासाठी घेतलेल्या संबंधितांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली़ ६ जून २००५ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन करून वितरण, पारेषण आणि उत्पादन या विभागांचे अनुक्रमे महावितरण, महापारेषण आणि महाजेनको या तीन कंपन्या स्थापन करण्यात आल्या. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी होल्ंिडग कंपनी स्थापण्यात आली. आता राज्यात वीज वितरणाला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने विभागनिहाय स्वतंत्र वीज कंपनी स्थापण्याचा सरकारचा प्रयत्न आहे़