एसटीत आता ड्रायव्हरच असेल ‘कंडक्टर’
By admin | Published: February 16, 2015 03:48 AM2015-02-16T03:48:52+5:302015-02-16T03:48:52+5:30
एसटीत नवनवे बदल करण्याचा निर्णय घेणाऱ्या महामंडळाने आपला खर्च कमी करण्यासाठी ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या सेवेत मोठा
मुंबई : एसटीत नवनवे बदल करण्याचा निर्णय घेणाऱ्या महामंडळाने आपला खर्च कमी करण्यासाठी ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या सेवेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीत ८ हजार ड्रायव्हरची भरती केली जाणार असून यामध्ये नुसत्याच ड्रायव्हरच्या भरतीबरोबर ‘ड्रायव्हर कम कंडक्टर’चीही भरती केली जाणार आहे. या नविन पदानुसार ड्रायव्हरलाच कंडक्टरचे काम करावे लागेल. ८ हजार ड्रायव्हरच्या भरती प्रक्रियेसाठी १६ फेब्रुवारीपासून आॅनलाईन अर्ज स्विकारले जाणार आहेत.
एसटी महामंडळात सध्या ३६ हजार ड्रायव्हर आहेत. मात्र हे ड्रायव्हर कमी पडत त्यामुळे ड्रायव्हरची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज स्विकारले जातील. लेखी परिक्षेबरोबरच ड्रायव्हिंग चाचणीही घेतली जाणार आहे. लेखी परिक्षा ही शंभर मार्कांची असून मे महिन्यात परिक्षा, जूनमध्ये निकाल आणि जुलै महिन्यापासून ट्रेनिंग होईल. (प्रतिनिधी)