आता दरवर्षी हापूस लगडणार !

By admin | Published: April 22, 2015 04:29 AM2015-04-22T04:29:44+5:302015-04-22T04:29:44+5:30

डॉ़ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन आणि इस्रायली तंत्रज्ञान यांच्या समन्वयातून हापूस लागवडीबाबत केलेल्या प्रयोगांना यश आले असून,

Now every year! | आता दरवर्षी हापूस लगडणार !

आता दरवर्षी हापूस लगडणार !

Next

शिवाजी गोरे, दापोली (जि. रत्नागिरी)
डॉ़ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन आणि इस्रायली तंत्रज्ञान यांच्या समन्वयातून हापूस लागवडीबाबत केलेल्या प्रयोगांना यश आले असून, या नव्या तंत्रज्ञानामुळे दरवर्षी हापूसचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे. या प्रयोगात हापूस कलमाचे पुनरुज्जीवन करण्यावर भर देण्यात आला असून, त्यामुळे खर्चातही मोठी कपात होणार आहे.
कोकणातील हापूस आंब्याची बहुतांश लागवड ही पारंपरिक पद्धतीने १०Ÿ१० मी अंतरावर होते. अनेक बागांमध्ये झाडे उंच वाढली असून, पाने व खोड यांचे प्रमाण व्यस्त झाले आहे. हापूसला मोहोर एक वर्ष आड येतो. मात्र या संशोधनामुळे आता दरवर्षी हापूस झाडाला लगडणार आहे़
उत्पादकता वाढवण्यास तसेच नवीन बागांसाठी सुधारित तंत्रज्ञान विकसित करण्यास केंद्र सरकारने इस्त्रायलच्या सहकार्याने आंबा गुणवत्ता केंद्र स्थापन केले. या केंद्रात जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन, आंब्याची सधन लागवड, दर्जेदार आंबा कलमांची निर्मिती व त्यासाठी सुधारित मूळकांडांचा वापर याबाबत विविध प्रयोग हाती घेण्यात आले. हे तंत्रज्ञान विकसित होत असताना थेट शेतावरही त्याची प्रात्यक्षिके घेण्यात आली. जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन व पुनरुज्जीवन केलेल्या आंबा बागांचे घनलागवडीमध्ये रूपांतर हे महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. झाडे आटोक्यात आल्यामुळे फवारणी, काढणी आदी मशागतीची कामे अत्यंत सुलभपणे करता येतात. हे तंत्रज्ञान विकसित करण्यास ४०० प्रशिक्षक तयार करण्यात आले असून, १० हजारांवर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

Web Title: Now every year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.